विष पिऊन एकाची आत्महत्या
मुखेड - मुखेड तालुक्यातील सुनील डोईफोडे (वय २६) या युवकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण कळले नाही. त्याला देगलूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुखेड पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली.
पोलीस ठाण्यात गोंधळ
लोहा - लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलीस ठाण्यामध्ये दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या एका आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बुधवारी ही घटना घडली. आरोपीने दारू पिऊन आरडाओरड करून माझी फिर्याद घ्यायला उशीर का करता असे म्हणत धक्काबुक्की करून टेबलवरील काचेवर बुक्की मारली. सहायक फौजदार विनायक तिडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. फौजदार गिते तपास करीत आहेत.
दुचाकी लंपास
मुखेड - जिल्हा परिषद हायस्कूल येथून गोपाळ पाटील यांची दुचाकी (क्र. एम.एच.२६-ए.ई.१०८५) चोरट्यांनी लांबविली. दुचाकीची किंमत ३० हजार रुपये होती. मुखेड पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. महिंद्रकर तपास करीत आहेत.
नांदेडकर यांची निवड
कुंडलवाडी - ऑल इंडिया तंजीम ए इन्साफच्या बैठकीत कुंडलवाडी शहराध्यक्षपदी माजीद नांदेडकर यांची निवड झाली. सविस्तर कार्यकारिणी अशी- उपाध्यक्ष शेख माजीद मैनोद्दीन, सचिव फहीम खान, सहसचिव शेख जब्बार, सदस्य सिद्धांत कांबळे, अनिस हनीफ, शेख सलमान, शेख अहमद, शेख बासीद, शेख नजीर, शेख युसूफ आदी उपस्थित होते.
बाऱ्हाळीत स्थापना दिवस
बाऱ्हाळी -पतंजली योगपीठाचा स्थापना दिवस भारत स्वाभिमान व पतंजली योग परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला संघटक दत्तात्रय काळे, महिला प्रभारी ऊर्मीला साजणे, जिल्हा प्रभारी अनिल अमृतवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाऱ्हाळीचे सन्मुख मठदेवरू व महिला प्रभारी संध्या मठदेवरू यांनी योग अखंडित ठेवले. कार्यक्रमाला नरसिंग अस्वले, केशव रापतवार, सूर्यकांत बेल्लुरे, मोहन कोंडेवाड, प्रेमला पंचगटे, मनीषा पवार, भीमराव राठोड, संजय पवार, मनोज मठपती, ऊर्मीला कंदरफळे आदी उपस्थित होते.
नायगाव येथे प्रकाशन
नायगाव - पद्मशाली समाज कर्मचारी संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन बुधवारी करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चरपीलवार, नागेश पुठ्ठा, विठ्ठलराव गुरुपवार, किशनराव कोकुलवार, तुळशीराम बिरेवाड, व्यंकट चन्नावार, देवीदास मोरेवाड, साईनाथ आलेवाड, पिराजी चन्नावार, शंकर रामगीनवार, बाळू चलमेवार आदी उपस्थित होते.
ब्रह्मवाडी बिनविरोध
हदगाव - हदगाव तालुक्यातील ब्रह्मवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली. बिनविरोध सदस्यांमध्ये विजया घारके, पद्मा चौंडे, अनुसयाबाई कुंटुरे, संगीता कामारे, मारोती कोकणे, नारायण किनाळे, राजेश सूर्यवंशी यांचा समावेश आहे. नूतन सदस्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे बापूराव घारके, दिगंबरराव घारके, आनंदराव कोकणे, लक्ष्मण घारके, हरिश्चंद्र चौंडे, शेषेराव कामारे, संतोष धोतरे, जळबा बल्लाळे, अविनाश घारके आदींची उपस्थिती होती.