शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:13 AM

हातभट्टीवर कारवाई हदगाव - मनाठा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हातभट्टीवर पोलिसांनी छापे मारले. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक ...

हातभट्टीवर कारवाई

हदगाव - मनाठा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हातभट्टीवर पोलिसांनी छापे मारले. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चिट्टेवार, कर्मचारी शाम वडजे, वाघमारे, दत्ता वडजे, नरवाडे यांनी ही कारवाई केली. दारूअड्डे उद्‌ध्वस्त केले. अधिक तपास सुरू आहे.

पीएचसीला भेट

हदगाव - जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दीपक कदम, ग्रामविकास अधिकारी आनंद शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन संगपवाड, डॉ.स्मिता राठोड उपस्थित होते. यावेळी ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन सुभाष राठोड यांनी केले. तर डॉ.बोदरवाड यांनी आभार मानले.

इस्लापूरला जोरदार पाऊस

इस्लापूर - इस्लापूर, शिवणी, जलधारा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले. नदी-नाल्यात पाणी वाहू लागल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. यावेळी मृग नक्षत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. नंतर मात्र दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.

नामफलकाचे अनावरण

लोहा - तालुक्यातील फुलमाळ तांडा व उमरा येथे गोरसेना संघटनेच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाला प्रकाश पवार, निळू पवार, अरविंद राठोड, अमोल राठोड, गुलाब जाधव, राहुल जाधव, नामदेव पवार, सतीश राठोड, रामराव राठोड, गोविंद जाधव, बालाजी पवार, मोहनराव पवार यांची उपस्थिती होती.

अधिकाऱ्यांचा सत्कार

माहूर - पशुधनाची लाळ खुरकुत लसीचे उद्दिष्ट पूृर्ण केल्याबद्दल माहूर पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बोधनकर, पशुधन विकास अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ.योेगेश पाटील, पशुधन विकास अधिकारी डी.एस.मिरगे यांची उपस्थिती होती. यानंतर घुगे यांनी कुपटी पशुउपचार केंद्राला भेट दिली.

हदगावला राष्ट्रवादीचे आंदोलन

हदगाव - पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात हदगाव येथे केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात तालुकाध्यक्ष देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.देवराव पाटील, शहराध्यक्ष अभिजित रुद्रकंठवार, फेरोज अली खान, अमोल कदम, राजेश राऊत, राजू पाटील, शफी पटेल, प्रशांत सिंगनवाड, सुनील मगर, फयाज खान, देवा पाटील, शुभम कदम आदी उपस्थित होते.

सिंदगी परिसरात पाऊस

किनवट - तालुक्यातील सिंदगी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. तब्बल सात ते आठ तास पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे पिकांत उगवण झाली आहे.

कंधारात हाणामारी

कंधार - फळांच्या गाड्यावरून कंधारमधील शिवाजी हायस्कूलसमोर मारामारी झाल्याची घटना २ जुलै राेजी घडली. पोलिसांनी सहा जणांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा नोंदवला. पोलीस उपनिरीक्षक मुखेडकर तपास करीत आहेत.

करडखेड येथे आंदोलन

देगलूर - करडखेड ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिव्यांगांनी थाळीनाद आंदोलन करून मानधन देण्याची मागणी केली. आंदोलनात तालुकाध्यक्ष अनिल रामदीनवार, शाखा प्रमुख शिवाजी शिंदे, रवि ठाकूर, कोकणे, ग्रामपंचायत सदस्य जयदीप गाडे, बालाजी इबितदार, बालाजी शिंदे, मारोती शिंदे, तेलंग आदी उपस्थित होते.

वरुण सरदेसाई यांचे स्वागत

लोहा - लोहा येथे युवा सेनेचे राज्य सचिव वरुण सरदेसाई यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, माधव पावडे, मिलिंद पाटील, गणेश तुप्तेवार, स्वप्नील पाटील, चंद्रकांत पाटील, धनंजय पाटील, बालाजी गाडेकर, गजानन कराडे, अमर शेख यांची उपस्थिती होती.

घरपोच अनुदान वाटप

हिमायतनगर - खावटी अनुदान योजनेचे १ हजार १३५ लाभार्थ्यांना घरपोच अनुदान वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांना मटकी, उडीद दाळ, चवळी, पांढरा वटाणा, गरम मसाला, शेंगदाणा तेल, मिरची पावडर, साखर, चहा पावडर आदींचे वाटप करण्यात आले.

प्रल्हाद वाघमारे सेवानिवृत्त

मुदखेड - जिल्हा बँकेच्या माळकौठा शाखेचे लेखापाल प्रल्हाद वाघमारे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी प्रशासकीय व्यवस्थापक माणिकराव कदम, नगरसेवक कमलेश चौदंते, मुख्याध्यापक रामप्रसाद सोनी, पप्पू कालानी, शाम पवळे, मनोज कमटे, इश्वर पिन्नलवाड, शिवानंद देवके, व्ही.आर.कदम, केशवराव लोखंडे, किशन गिरी महाराज, नारायण नरडीले आदी उपस्थित होते.