शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

गुणवत्तेचा बाजार ! सोन्याचे बिस्कीट अन् गाडी देऊन ‘गुणवंतां’ची क्लासेसकडून पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2021 8:05 PM

कोट्यातील कोचिंग क्लासेसच्या तोडीस तोड गुणवत्ता देण्याची ताकद मराठवाड्यात आहे, हे काही नामवंत कोचिंग क्लासेसने सिद्ध केले.

ठळक मुद्देपरराज्यातील क्लासेसनंतर आता मराठवाड्यातील क्लासेसकडून आमिष

- श्रीनिवास भोसले

नांदेड : एमपीएससी परीक्षेनंतर देशपातळीवरील ‘नीट’ परीक्षेमध्ये डमी विद्यार्थी बसविल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर आता नीट, जेईई-मेन्स, जेईई ॲडव्हान्सच्या ‘गुणवंतां’ची रोख पैशासह सोन्याचे बिस्कीट अन् गाडी अशा स्वरूपाचे आमिष देऊन पळवापळवी केली जात आहे. परंतु, अशाप्रकारे शिक्षण अन् गुणवत्तेचा बाजार मांडणाऱ्यांना नेटकऱ्यांकडून चांगलेच ट्रोल केले जात आहे.

कोट्यातील कोचिंग क्लासेसच्या तोडीस तोड गुणवत्ता देण्याची ताकद मराठवाड्यात आहे, हे काही नामवंत कोचिंग क्लासेसने सिद्ध केले. त्यामुळेच पूर्वी नीट, जेईई परीक्षेच्या तयारीसाठी देशभरातील विद्यार्थ्यांचा कल राजस्थानमधील कोट्याकडे असायचा. परंतु, नांदेडसह लातूरमधील कोचिंगच्या गुणवत्तेमुळे महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील विद्यार्थीही मराठवाड्याकडे भविष्याची आशा म्हणून पाहत आहेत. परंतु, काही कोचिंग क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थी पळवापळवीच्या धोरणामुळे नामुष्कीची वेळ ओढवत आहे. गतवर्षी विदर्भातील एका विद्यार्थिनीने तीन कोचिंग क्लासेसच्या जाहिरातीमध्ये आपले फोटो दिले. त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले. असे अनेक प्रकार स्वत:ची प्रसिद्धी करून घेण्यासाठी आणि देशात आपणच कसे टॉप आहोत, हे दाखविण्यासाठी कोटा, हैदराबाद, दिल्लीच्या कोचिंग क्लासेसकडून केले जायचे. त्यात आता लातूर, नांदेडस्थित काही क्लासेसनी उडी घेतली आहे.

१२ सप्टेंबर रोजी नीटची परीक्षा झाली आहे. यंदा फिजिक्स विषयामुळे मेरिट घसरणार असल्याची धास्ती विद्यार्थ्यांसह क्लासेस संचालकांनी घेतली आहे. त्यामुळे काही क्लासेसने निकालापूर्वीच टॉप विद्यार्थ्यांना हेरण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी खास लोकांची टीम कामाला लावली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळत आहेत, अथवा राज्यात, देशात टॉप येईल, असा अंदाज घेतला जात आहे, त्या विद्यार्थ्यांच्या नजीकचे नातेवाईक, पालकांपर्यंत पोहोचून त्यांना गुणवत्तेच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून तुम्हाला सोन्याचे बिस्कीट, अंगठी, दुचाकी गाडी अथवा रोख रक्कम देण्याची भुरळ पालकांना घातली जात आहे. त्या बदल्यात केवळ तुमचा विद्यार्थी आमच्याकडे शिकल्याचा दावा तुम्हाला करायचा आहे, असे सांगण्यात येत आहे. हा प्रकार करणाऱ्या क्लास संचालकांसह पालक आणि विद्यार्थ्यांवरही चार-सहा महिन्यांनी नामुष्कीची वेळ येते. परंतु, काही पालक, विद्यार्थी संबंधित क्लासेसच्या जाहिराती पाहून भुलतात अन् तिथे प्रवेश घेतात. एकप्रकारे गुणवंतांनी दिलेल्या होकारामुळेच भविष्यातील गुणवंतांचे नुकसान होत आहे.

पालक-विद्यार्थ्यांनी आमिषाला बळी पडू नयेआपण ज्यांच्याकडे शिकलो, ज्यांनी आपल्यासाठी मेहनत घेतली, त्याच गुरूंना आपण आपल्या यशाचे श्रेय द्यावे, असे संस्कार पालकांकडून मुलांना दिले जायचे. परंतु, काही पालक आपल्या पाल्याच्या गुणवत्तेचा बाजार करीत आहेत. शिक्षण एकाकडे अन् जाहिरात दुसऱ्याकडे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक-विद्यार्थ्यांसह संबंधित क्लास संचालकांसह शिक्षण क्षेत्राचीही बदनामी होते. त्यामुळे अशा भूलथापा अन् आमिषाला पालक, विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन शिक्षणप्रेमींकडून केले जात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीNandedनांदेड