लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : मतीमंद मोठ्या बहिणीशी विवाह करण्यास कुणीही तयार नसल्याने मनाचा मोठेपणा व औदार्य दाखवून धाकटी पुढे आली, तिने माझ्याशी लग्न करावयाचे असल्यास मोठ्या बहिणीशीही लग्न करावे, अशी अट घातली. ही अट एका युवकाने मान्य करुन एकाच वेळी दोघींशीही विवाह केला.बिलोली तालुक्यातील कोटग्याळ येथे बुधवारी विवाह पार पडला़ दोन्ही वºहाडी मंडळीसह पालकांनाही विवाह मंजूर असल्याने माजी आ़ रावसाहेब अंतापूरकर यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभाशिर्वाद दिले़ कोटग्याळ येथील गंगाधर शिरगिरे यांना चार मुली़ ज्यात पहिली धुरपताबाई अंशत: मतीमंद आहे़ दुसऱ्या व तिसºया मुलींचे लग्न झाले. चौथी राजश्री लग्नाला आली़ मोठी धुरपताबाई मतीमंद असल्याने तिच्याशी कोण विवाह करणार? असे विचार शिरगीरे कुंटुंबियात सुरु झाले.यादरम्यान राजश्री हिला स्थळही येवू लागले.त्यावर माझ्याशी विवाह करावयाचा असल्यास मोठ्या बहिणीलाही स्वीकारावे, अशी भूमिका राजश्रीने घेतली़ समराळा ता. धर्माबाद येथील सायन्ना उरेकर यांचा साईनाथ नावाचा मुलगा विवाहास तयार झाला. दोन्ही पालक व नातेवाईकांच्या मर्जीनुसार पत्रिकाही छापण्यात आल्या. दोन वधू व एक वर अशी पत्रिका पहावयास मिळाली़ २ मे बुधवारी एकाच मंडपात सकाळी ११ वाजता धुरपताबाई व राजश्री यांचा विवाह साईनाथसोबत पार पडला. दोन्ही गावच्या निमंत्रित गावकºयांसह नातेवाईकांनीही मंगलाष्टकाच्या सनई आवाजातून आशिर्वाद दिले़.समाजात सवतीचे भांडण आपण नेहमीच पाहत असतो़ पण मनाचा मोठेपणा व वडिलांचे ओझे हलके करण्यासाठी लहान बहिणीने मोठ्या बहिणीला सवत करून घेतले़ एवढेच नव्हे तर एकत्रित लग्न करून विवाहाच्या सर्व विधी देखील पूर्ण केल्या़ गरीब कुटुंबातील मुलीने एक चांगला आदर्श समाजासमोर ठेवला असल्याचे मत माजी आ़ रावसाहेब अंतापूरकर व कोटग्याळचे सरपंच शंकर शामंते यांनी व्यक्त केले़
एकाच मंडपात युवकाने केला दोन बहिणींशी विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 12:43 AM