शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

महापौर,जि.प. अध्यक्षही आता थेट जनतेतून निवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:41 AM

देशात ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीने झालेल्या स्थानिक संस्थाच्या बळकटीकरणात आता पदाधिका-यांसह लोकप्रतिनिधींचे सक्षमीकरण आवश्यक आहे. आजही स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासनच वरचढ असल्याने लोकप्रतिनिधीचे महत्त्व म्हणावे तसे वाढले नसल्याचा सूर नांदेडमध्ये झालेल्या विभागीय परिषदेतील खुल्या चर्चासत्रात उमटला. दरम्यान, सरपंच, नगराध्यक्षाप्रमाणेच महापालिकेचे महापौर आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचीही थेट जनतेतून निवड व्हावी, अशी मागणीही यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी केली.

ठळक मुद्देविभागीय परिषद : स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : देशात ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीने झालेल्या स्थानिक संस्थाच्या बळकटीकरणात आता पदाधिका-यांसह लोकप्रतिनिधींचे सक्षमीकरण आवश्यक आहे. आजही स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासनच वरचढ असल्याने लोकप्रतिनिधीचे महत्त्व म्हणावे तसे वाढले नसल्याचा सूर नांदेडमध्ये झालेल्या विभागीय परिषदेतील खुल्या चर्चासत्रात उमटला. दरम्यान, सरपंच, नगराध्यक्षाप्रमाणेच महापालिकेचे महापौर आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचीही थेट जनतेतून निवड व्हावी, अशी मागणीही यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी केली.बुधवारी नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावर विभागीय परिषद झाली. या परिषदेतील खुल्या चर्चासत्रात नागरिक, प्रतिनिधी तसेच पदाधिका-यांनी आपली मते मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी तसेच निकोप लोकशाहीसाठी निवडणूक आयोगाने या परिषदेतून सूचना मागविल्या आहेत. यातील योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. समारोपीय सत्रास उपस्थित असलेल्या कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, औरंगाबाद महापालिकेचे माजी नगरसेवक एम. ए. पठाण, सामाजिक कार्यकर्ते माधवराव पाटील शेळगावकर यांच्या उपस्थितीत सूचना केल्या. या सूचनामध्ये पदाधिका-यांना आजही प्रशासनाच्या मर्जीनेच चालावे लागते. ही बाब अधोरेखित करुन पदाधिका-यांना काही अधिकार द्यावे, अशी सूचना करण्यात आली. त्याचवेळी नगराध्यक्ष, सरपंच ही पदे थेट जनतेतून निवडली जात आहेत. त्याप्रमाणेच महापौरांसह पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्षांची निवडही जनतेतूनच झाली पाहिजे, अशी सूचनाही यावेळी पुढे आली तर जनतेतून निवडलेल्या सरपंचांना गावातील इतर समित्यांचे अध्यक्षपदही द्यावे, अशी सूचना काहींनी केली. गावात सरपंच असताना शालेय व्यवस्थापन समिती, पाणी व्यवस्थापन समिती अशा विविध समित्यांवर इतरांची निवड केली जाते. ग्रामपातळीवर काम करताना यातून वाद होत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. मतदानही नागरिकांना सक्तीचे करण्याची गरज असल्याचा सूर यावेळी उमटला.स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण कालावधीही आमदारांप्रमाणे जास्त असावा, त्यातून लोकप्रतिनिधीला काम करण्याची संधी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले.नागरिक, लोकप्रतिनिधींच्या सूचना, प्रश्नांना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. समारोपप्रसंगी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी लोकशाही बळकटीकरणात सुजाण नागरिक आवश्यक असल्याचे सांगितले.