नांदेड : बांधकामासाठी आपल्याला जे बांधकाम साहित्य आवश्यक असते, त्यात सिमेंट, रेती आणि विटा याबरोबरच स्टीलचा वापर केलेला आढळतो. मात्र, प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी या साहित्याच्या गुणवत्तेविषयी खातरजमा कशी करून घ्यायची, हे आपल्याला माहिती नसते. त्यासाठी बांधकाम मिस्त्री हा मोलाची मदत करू शकतो. त्यामुळे या बांधकाम मिस्त्रींना जर अधिक कौशल्यपूर्ण केले तर बांधकामाचा दर्जा टिकवून ठेवण्याबरोबरच बांधकामाच्या गुणवत्तेतदेखील सुधारणा होऊ शकते, हीच बाब ओळखून आयकॉन स्टीलच्यावतीने बांधकाम मिस्त्रींसाठी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
नांदेड जिल्ह्यातील बामणी फाटा येथील तुळजाई ट्रेडर्स तसेच लोहा येथील हर्ष एजन्सी व तामसा येथील रणजित ट्रेडर्स यांच्यावतीने दिनांक ११, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी हा मिस्त्रींसाठीचा मेळावा घेण्यात आला. यावेळी बांधकाम मिस्त्रींना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्कृष्ठ प्रकल्पांची उभारणी कशाप्रकारे करता येते, याचे प्रात्यक्षिक संगणकाद्वारे दाखविण्यात आले. आजकाल मोठ्या प्रमाणात बांधकामात आयकॉन स्टीलचा वापर करण्यात येत आहे. उच्च गुणवत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची अनोखी साथ म्हणजेच आयकॉन स्टील हे आता सर्वपरिचित झाले आहे. अचूक गुणवत्तेवर आधारलेले सर्व मापदंड पूर्ण करत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा प्रयोगशाळेत या स्टीलची तपासणी करण्यात येते. त्यामुळे प्रत्येक कसोटीवर हे स्टील सरस ठरत असून, ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले स्टील म्हणून ‘आयकॉन’ ओळखले जात आहे. लवचिकतेसह स्ट्रेन्थ आणि वजन यांची अचूक त्रिसुत्री असलेले हे उच्च तंत्रज्ञानाने निर्मित स्टील असल्याचे मत तज्ञ्जांनी यावेळी व्यक्त केले. बांधकाम मिस्त्रींसाठी आयोजित या मेळाव्यात कोरोनाविषयीही जनजागृती करण्यात आली. नियमित मास्क वापरण्याबरोबरच साबणाने हात स्वच्छ धुवा, आपापसात सुरक्षित अंतर ठेवा तसेच आपल्या व कुटुंबांच्या आरोग्याची काळजी घ्या, असा संदेश देण्यात आला.