नांदेड : दुष्काळी परिस्थिती मुळे इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीच्या पात्रात सोडावे या व इतर अनेक मागणीसाठी गेल्या 9 दिवसापासून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद व विदर्भ व मराठवाड्यातील नदीच्या तीरावर अनेक गावातील शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन चालू आहे. यावर प्रशासनाने कुठलाही तोडगा न काढल्याने काल मुंबई येथे जाऊन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर व प्रदेश संघटक चक्रधर पाटील देवसरकर यांनी जलंसपदा मंत्री गिरीष महाजन,विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन पैनगंगेच्या पाणी प्रश्न संदर्भात लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली.
यावर्षी पावसाळ्यात कमी पाऊस व शेवटच्या टप्यात पावसाने दडी मारल्यामुळे पैनगंगेच्या पात्र कोरडे ठक पडले आहे. पात्र कोरडे पडले असल्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.नदीच्या तीरावर वसलेले अनेक गावातील नागरिक हवालदिल झाले आहेत. पात्र कोरडे पडले असल्यामुळे जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून हा प्रश्न सोडवण्यासाठी व इतर अनेक मागणीसाठी 19 नोव्हेंबर पासून हजारो शेतकरी बोरी ता.उमरखेड नदीच्या पात्रात धरणे आंदोलन करीत आहेत.याची प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे काल मुंबई येथे जाऊन पाणीप्रश्न सोडविण्याचा संदर्भात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून त्यांच्या कानावर विषय टाकताच त्यांनी जलंसपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी बोलून पाणी प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी केली.
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना भेटून पैनगंगेच्या पाणी प्रश्न व कयाधू शाखा कालवा,डाव्या कालवाच्या अनेक कामाच्या प्रलंबित समस्या,व इतर अनेक मागन्याचे निवेदन देण्यात आले,यावर तात्काळ तोडगा काढावा अशी आग्रही मागणी व भूमिका जलसंपदा विभागाच्या अनेक भोंगळ कारभार शेवटच्या टोकापर्यंत पाणी जात नसल्यामुळे लाभक्षेत्रात शेतकऱ्यांना सिंचन साठी येत असलेल्या अडचणी,कमांड येरियामुळे अनेक योजना पासून वंचित राहवे लागत असल्यामुळे या सर्व बाबीची कैफियत जलंसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासमोर मांडून तातडीने पूर्ण प्रश्न मार्गी लावावे,तात्काळ आंदोलनकर्तेच्या मागणीवर सकारात्मक विचार करत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी भागवत देवसरकर यांनी यावेळी केली आहे.
यावेळी मुंबई येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश संघटक व आंदोलनकर्ते चक्रधर पाटील देवसरकर,सामाजिक कार्यकर्ते शेख इस्त्याक अहमद,जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम,किशनराव वानखेडे,विश्वासराव वानखेडे,श्रीधर पाटील देवसरकर,तुकाराम पाटील, धनजय माने,राजू पाटील सेलोडेकर,संतोष कदम,डॉ.प्रकाश वानखेडे,शिवाजी कदम,संदीप पावडे,दीपक पवार आदी उपस्थित होते.