नांदेड- संसदेच्या मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या अधिवेशन काळात मराठवाड्यातील रेल्वेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषद व रेल्वे संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांबरोबर रेल्वे मंत्र्यांशी चर्चा घडवून आणीन, असे प्रतिपादन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. ते मजविपच्या बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी मा. खा. डॉ. व्यंकटेश काब्दे हे होते.
ओमप्रकाश वर्मा म्हणाले की, मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या एकतेअभावी मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांकडे केंद्रशासन गांभीर्याने पाहत नाही. तेंव्हा खासदारांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. माजी खा.डॉ. काब्दे म्हणाली की, रेल्वे मंत्रालय व अधिकारी अन्य भागाच्या तुलनेत मराठवाड्यातील रेल्वे मार्गाच्या वाढीसंदर्भात व विद्युतीकरणाच्या प्रश्नांबाबत सापत्न भावाने वागतात. हा मराठवाड्यातील जनतेवरील अन्याय असून त्याविरुद्ध आपण सर्वांनी सांघिक स्वरूपात लढले पाहिजे.
यावेळी शंतनू डोईफोडे, उमाकांत जोशी, रामराव थडके, नागोराव रोषणगावकर, डी. के. पाटील, वसंत पवार होटाळकर, एम. आर. जाधव, ऍड. धोंडिबा पवार यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन डी.एम. रेड्डी यांनी केले तर प्रा. डॉ. व्ही.व्ही. सुकाळे यांनी आभार मानले. प्रा. उत्तमराव सूर्यवंशी, संभाजी पवार, प्रा. डॉ. बालाजी कोम्पलवार, डॉ. अशोक सिद्धेवाड, मारोतराव देगलूरकर, सोपानराव मारकवाड, प्रा. गंगाधर हिंगोले, उत्तम भांगे, कैलास येसगे, स.मियाँखान, पुष्पा कोकीळ, प्राचार्य गोपाळराव कदम, ऍड. शिवाजीराव हाके, आर. एन. उन्हाळे, श्रावण भिलवंडे, पंजाबराव कदम, आदी उपस्थित होते