लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आरक्षणाच्या जागेत झालेला मोठ्या प्रमाणातील अनधिकृत विकास तसेच गुंठेवारीअंतर्गत नियमित केलेले भूखंड पाहता महापालिका हद्दीतील असदुल्लाबाद सर्व्हे नं़३४ वरील असलेले आरक्षण उठवण्याचा प्रशासनाने ठेवलेला प्रस्ताव बुधवारी महापालिकेच्या सभेत एकमुखाने फेटाळण्यात आला़ त्याचवेळी प्रभागातील विकासकामांच्या ठरावादरम्यान सत्तातंर्गत विरोधही पुढे आला़महापौर शीलाताई भवरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली़ या सभेत एकूण मूळ ८ प्रस्ताव आणि पुरवणी विषयपत्रिकेत १५ प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते़ त्यामध्ये प्रशासनाने ठेवलेला असदुल्लाबाद सर्व्हे नं़ ३४ सिटी सर्व्हे नं़ ९९७५ मधील आरक्षण क्ऱबी-३६, बी-३७, बी-३८ या जागांवर शाळा आणि क्रीडांगणाचे आरक्षण होते़ मात्र प्रत्यक्षात या जागेवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत विकास झालेला आहे़ तसेच गुंठेवारीअंतर्गत काही भूखंड नियमित केले आहेत़ काही भूखंडास महापालिकेनेही बांधकाम परवानगी दिली आहे़ तर काही प्रकरणात नाकारली आहे़ या जागेत झालेला विकास पाहता जागा संपादित करून आरक्षण विकास करणे मनपास शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले़ त्यामुळे सदर जागेवरील आरक्षण हे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ नुसार वगळावे असा ठराव होता़ मात्र या ठरावाच्या चर्चेत शहरातील अन्य आरक्षित ठिकाणांचीही अशीच अवस्था झाल्याचे सांगत इतर ठिकाणचे आरक्षण वगळणार काय असा सवाल सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले, अब्दुल सत्तार, आनंद चव्हाण, जयश्री पावडे, दीपक रावत, अब्दुल हाफिज, महेंद्र पिंपळे, दुष्यंत सोनाळे आदींनी उपस्थित केला़ केवळ याच जागेचे आरक्षण उठविण्याची गरज काय असे सांगत हा प्रस्ताव सभागृहाने नामंजूर केला़ त्यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी सदर प्रस्ताव हा निवडणुकीपूर्वी तयार केल्याचे सांगत सभागृहाचा निर्णय राहिल असे स्पष्ट केले़ मनपाच्या शाळांत शिक्षक नसल्याचा विषयही चर्चेला आला़ शिक्षक भरतीची मागणी अब्दुल सत्तार यांनी केली़ त्यावेळी शिक्षक भरती महापालिकेला करता येत नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले़ त्यावेळी शिक्षकच नसतील तर शाळा चालवता कशाला असा संतप्त प्रश्नही सत्तार यांनी केला़ यावर तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हा विषय थांबला़मनपा देणार जीवनगौरव पुरस्कारमहापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबतही सभागृहात चर्चा करण्यात आली़ २६ मार्च रोजी महापालिकेचा वर्धापन दिन असून त्यानिमित्त उर्दू, हिंदी मुशायरा आदी कार्यक्रमांचे आयोजन करावे अशी सूचना अब्दूल सत्तार यांनी केली़ तर महापालिकेच्यावतीने शहरातील उत्कृष्ट समाजकार्यकार्य करणाºया समाजसेवकास जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्याची सूचना वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी केली़ या सर्व कार्यक्रमांसाठी महापौर शीलाताई भवरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णयही घेण्यात आला़डम्पिंग प्रकरणात खुलासा नाहीच, राजदंड पळवलाशिवसेनेचे सभागृहात एकमेव सदस्य बालाजी कल्याणकर यांनी अमृतअंतर्गत हरीत शहर योजनेत डम्पिंग ग्राऊंडवर झाडे लावण्याचा ठराव घेतला होता़ तो ठराव रद्द झाला का, असा प्रश्न विचारला़ यावर महापौरांनी खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली़ मात्र त्यांच्या या मागणीकडे महापौरांनी दुर्लक्ष केले़ वारंवार प्रश्न उपस्थित करूनही उत्तर न मिळाल्याने अखेर कल्याणकर यांनी सभागृहातून राजदंडच पळवून नेला़ यामुळे काहीवेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली़ या सर्व प्रकारानंतरही कोणताही खुलासा महापौरांनी केला नाही़ त्यामुळे डम्पिंग ग्राऊंडवरील झाडांचा विषय हा अवघड जागचे दुखणे झाला आहे़
आरक्षण वगळण्याचा ठराव सभेने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:16 AM
आरक्षणाच्या जागेत झालेला मोठ्या प्रमाणातील अनधिकृत विकास तसेच गुंठेवारीअंतर्गत नियमित केलेले भूखंड पाहता महापालिका हद्दीतील असदुल्लाबाद सर्व्हे नं़३४ वरील असलेले आरक्षण उठवण्याचा प्रशासनाने ठेवलेला प्रस्ताव बुधवारी महापालिकेच्या सभेत एकमुखाने फेटाळण्यात आला़ त्याचवेळी प्रभागातील विकासकामांच्या ठरावादरम्यान सत्तातंर्गत विरोधही पुढे आला़
ठळक मुद्देप्रशासनाचा होता ठराव : इतर जागांचे आरक्षण उठविण्याची सदस्यांनी केली मागणी