नांदेड : साईप्रसाद संस्थेच्या वतीने मंगळवारी सायंकाळी शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ दिवाळीनिमित्त शहिदांना अभिवादन करण्यासाठी एक पणती शहिदांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या उपक्रमाला नांदेडकरांनी भरभरुन प्रतिसाद देत संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळून टाकला होता़साईप्रसादच्या वतीने वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात़ त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींसाठी विवाह मेळावा घेण्यात येतो़ विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात दररोज साधारणत: दोन हजारांवर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते़ तसेच आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला मदतीचा हात देण्यात येतो़ गेल्या तीन वर्षांपासून सैनिक कुटुंबियासोबत दिवाळी साजरी करीत त्यांच्या कुटुबियांचा गौरव करण्यात येतो़ दोन दिवसांपूर्वीच मोठ्या थाटामाटात हा कार्यक्रम पार पडला़ त्यानंतर मंगळवारी एक पणती शहिदांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़सायंकाळी साडेसहा वाजता आयटीआय चौक येथील महात्मा फुले पुतळ्यासमोर साईप्रसादच्या स्वयंसेवकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती़ यावेळी नांदेडकरांनी एक पणती शहिदांसाठी लावून हा सर्व परिसर उजाळून टाकला़ यामध्ये महिलांसह चिमुकल्यांनीही शहिदांसाठी पणती लावत त्यांना अभिवादन केले़
दिवाळीत एक पणती शहिदांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:53 AM
साईप्रसाद संस्थेच्या वतीने मंगळवारी सायंकाळी शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ दिवाळीनिमित्त शहिदांना अभिवादन करण्यासाठी एक पणती शहिदांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या उपक्रमाला नांदेडकरांनी भरभरुन प्रतिसाद देत संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळून टाकला होता़
ठळक मुद्देसाईप्रसादचा उपक्रमनांदेडकरांच्या प्रतिसादाने परिसर उजळला