शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 09:25 IST

अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 3.8 अशी नोंदविण्यात आलेली आहे.

नांदेड/हिंगोली :नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना मंगळवारी (22 ऑक्टोबर 2024)  सकाळी 06:52 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यासंदर्भात जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रानेही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केलवर 3.8 एवढी नोंदवण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे, भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून 29 किमी दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातील सावरगाव येते होता. या धक्क्यामुळे कुठलीही जीवित वा वित्त हानी नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राला प्राप्त झाली असल्याचे नांदेडमधील जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव या तालुक्यांनाही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या सहा वर्षापासून भुकंपाचे धक्के जाणवत आहेत. यापूर्वीही 4.5 रिश्टर स्केलचा धक्का जाणवला होता. गत सह ते सात वर्षापासुन सतत वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यास सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत.  त्यामुळे नागरीकांत भीती व्यक्त केली जात आहे.

भूकंप नांदेड जिल्ह्यात; हदरला हिंगोली जिल्हा...मंगळवारी नांदेड जिल्ह्यात भूकंप झाला आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत तालुक्यातील दांडेगाव, पांगरा शिंदे, वारंगा, कुरूंदा, कवठा, पिंप्राळा ,डोणवाडा व इतर अनेक भागांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी..तालुका प्रशासन नागरिकांची काळजी घेत आहे. अशावेळी नागरिकांनीही घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वसमतचे तहसीलदार शारदा दळवी यांनी केले आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपNandedनांदेड