शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

नांदेडला भूकंपाचा सौम्य धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 4:06 PM

शहरातील गणेशनगर भागात बुधवारी सायंकाळी सौम्य स्वरूपात जमीन हादरल्याची घटना घडली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूकंप मापन केंद्रात यासंबंधी तपासणी केली असता १.४ मॅग्नेट्युवस्केल इतका भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे निदर्शनास आले.

नांदेड : शहरातील गणेशनगर भागात बुधवारी सायंकाळी सौम्य स्वरूपात जमीन हादरल्याची घटना घडली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूकंप मापन केंद्रात यासंबंधी तपासणी केली असता १.४ मॅग्नेट्युवस्केल इतका भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे निदर्शनास आले असून यासंबंधी विद्यापीठाच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केल्याची माहिती प्रा. विजयकुमार यांनी दिली.

शहरातील गणेशनगर भागात बुधवारी सायंकाळी किंचित जमीन हादरल्याचे आढळून आले होते. सायंकाळी शहरातील काही भागात पाऊस असल्याने अनेकांना हा भूकंप असल्याचे जाणवलेही नाही. मात्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ केंद्रातील भूकंपमापक केंद्रावर १.४ मॅग्नेट्युवस्केल कंपनाची नोंद झाल्याने हा भूकंपच असल्याचे आता पुढे आले आहे.

बुधवारी सायंकाळी बसलेला भूकंपाचा धक्का सौम्य असला तरी नांदेड शहर आणि जिल्ह्याला यापूर्वीही भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. मार्च २००६, मार्च २०११, नोव्हेंबर मध्येही नांदेडकरांनी भुकंपाचे धक्के अनुभवले होते. मध्यंतरीच्या ८ वर्षात मात्र जिल्ह्यात भूकंपाची कसलीही नोंद नव्हती. जून २०१९ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूकंप मापन केंद्रावर ३.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी नांदेडकरांना हा सौम्य धक्का जाणवला.

टॅग्स :environmentपर्यावरणEarthquakeभूकंपMarathwadaमराठवाडा