नांदेड : बँक अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारी संप पुकारला़ त्यात लागोपाठ आलेल्या सुट्या आणि पुन्हा २६ डिसेंबर रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याने बँकांना अघोषित पाच दिवस सुटी राहत असल्याने नांदेड जिल्ह्यातील दररोजचे शेकडो कोटी रूपयांचे व्यवहार ठप्प होत आहेत़ परिणामी चाकरमान्यांसह सामान्यांना दैनंदिन व्यवहारासाठी लागणारी रोख रक्कम आणि व्यवहारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़केंद्र शासनाच्या बँकविरोधी धोरणांच्या विरोधात २१ डिसेंबर रोजी शुक्रवारी बँकेच्या अधिकाºयांनी एक दिवसीय संप पुकारला़ त्यामुळे शुक्रवारी बँकांचे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले. पुढे २२ आणि २३ डिसेंबरला चौथा शनिवार व रविवार असल्याने आपसुकच बँकांना सुटीच राहील. त्यानंतर २४ डिसेंबर रोजी सोमवारी एक दिवसासाठी संपूर्ण बँकांचे व्यवहार सुरु राहणार असून त्या पाठोपाठ मंगळवार, २५ डिसेंबर रोजी नाताळ सणानिमित्त शासकीय सुटी असल्याने पुन्हा एक दिवस बँक बंद राहणार आहे. त्याचबरोबर २६ डिसेंबर रोजी बँकेचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळे सलग पाच दिवस बँकांचे कोट्यवधी रूपयांचे व्यवहार ठप्प होणार आहेत.२४ डिसेंबर सोमवारी एक दिवसासाठी बँक सुरु असल्याने मागील तीन दिवसांतील व्यवहार पूर्ण करण्याबरोबरच पुढील दोन दिवस बँका बंद राहणार ही बाब लक्षात घेऊन बहुतांश ग्राहक सोमवारी बँकेत गर्दी करणार. त्यामुळे सर्व्हरवर ताण येऊन तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी सलग पाच दिवसांत नांदेड जिल्ह्यात एक हजार कोटींपेक्षा जास्त व्यवहार ठप्प होतील, अशी माहिती बँकेच्या सूत्राने दिली. दरम्यान, नांदेडात शुक्रवारी शिवाजीनगर भागातील स्टेट बँक आॅफ इंडियासमोर अधिकाºयांनी घोषणा देत सरकारच्या बँकविरोधी धोरणास विरोध दर्शविला़बँकेचे खासगीकरण रद्द करा, द्विपक्षीय करार लवकर करावा यासह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. शिवाजीनगर भागातील एसबीआय बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर कर्मचाºयांनी जोरदार घोषणा देत निदर्शने केली़ यावेळी शहर व जिल्ह्यातील विविध बँकांचे अधिकारी - संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते़ यामध्ये किरण जिंतूरकर, शशीकांत कुलकर्णी, रामराव मुन्नेश्वर, साहेबराव अकुलवार, जसबिरसिंघ टुटेजा, राजेश कंधारकर, माधव बनसोडे, प्रकाश पिल्लेवाड आदींची उपस्थिती होती़एटीएम नावालाच : रोकड नसल्याने नागरिक त्रस्तनांदेड शहर व परिसरातील विविध बँकांचे जवळपास २६० एटीएम आहेत़ परंतु, बहुतांश एटीएम या ना त्या कारणाने बंद आहेत तर काही एटीएममध्ये नेहमीप्रमाणे रोकड उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ शहरातील डॉक्टरलेन आणि छत्रपती चौक, आनंदनगर, भाग्यनगर, व्हीआयपी रस्ता या मुख्य रस्त्यांवर सर्वाधिक एटीएम केंद्र आहेत़ परंतु, त्यातील बोटावर मोजण्याएवढ्याच एटीएममध्ये पैसे मिळत आहेत़ बँकांचा संप आणि सलग सुट्या यामुळे बँकांही बंद असल्याने रोख रक्कम कुठून आणायची ? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे़ दरम्यान, ज्यांनी रविवार आणि नाताळ सुट्यांचे नियोजन करून २१ डिसेंबर पूर्वीची रोख रक्कमेची तजवीज करून ठेवली त्यांची सोय झाली आहे. इतरांची मात्र अडवणूक झाल्याचे चित्र आहे.
कोट्यवधींचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:58 AM
बँक अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारी संप पुकारला़ त्यात लागोपाठ आलेल्या सुट्या आणि पुन्हा २६ डिसेंबर रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याने बँकांना अघोषित पाच दिवस सुटी राहत असल्याने नांदेड जिल्ह्यातील दररोजचे शेकडो कोटी रूपयांचे व्यवहार ठप्प होत आहेत़
ठळक मुद्देपाच दिवस बँका बंद : चाकरमान्यांसह सर्वसामान्यांचे हाल