शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गोदामाईच्या कुशीत लाखो माशांनी सोडला जीव; कोण जबाबदार?

By श्रीनिवास भोसले | Published: April 22, 2023 6:59 PM

नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्राच्या बंदाघाट, गोवर्धन घाट आणि नावघाट परिसरात मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत; मासेमारीच्या उद्देशाने घातपाताची शक्यता 

नांदेड:गोदावरी नदीपात्रात अचानकपणे लाखो मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत. गोवर्धन घाट परिसरात लाखो माशांचा खच पडला असून नदीपात्रात मृत मासे तरंगत आहेत. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सदर मासे काढण्यासाठी मनपा यंत्रणा कामाला लागली असून जेसीबीच्या सहाय्याने मासे काढले जात आहेत. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मृत होण्याची ही तिसरी वेळ असूनही प्रशासनाला कारण शोधता आलेले नाही. त्यामुळे या निष्पाप माशांचा मृत्यूबद्दल कोणाला जबाबदार पकडणार, असा प्रश्न आहे. 

नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्राच्या बंदाघाट, गोवर्धन घाट आणि नावघाट परिसरात मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत. गतवर्षीदेखील उन्हाळ्यातच अशाचप्रकारे मृत माशांचा खच पडला होता. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळासह मनपानेही पाण्याचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठवले होते. परंतु, पाण्यात कोणत्याही प्रकारचे केमिकल आढळून आले नाही. त्यामुळे मासे कशामुळे मरण पावले याचे उत्तर अद्यापर्यंत मिळालेले नाही. त्यातच आता शुक्रवारी रात्री माशांचा खच गोदावरी नदीपात्रात मृतावस्थेत आढळून आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्यात माशांचा मृत्यू झाला, म्हणजे पाणी दुषित असावे अथवा त्यात कोणी तरी मासेमारीच्या उद्देशाने काही तरी केमिकल टाकले असावे, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, पाण्याचे नमुने घेवून ते तपासणी केल्याशिवाय सत्यता बाहेर येणार नाही.

मरण पावलेल्या माशांचा गोदावरी काठी ढिग पडला आहे. त्याचबरोबर पाण्यात मरण पावलेले मासे फुगून पाण्याचा प्रवाहाबरोबरच काठेवर येत आहेत. त्यामुळे नदीपात्राच्या कडेला लाखो मासे मृतावस्थेत तरंगत असताना दिसत आहेत. ते मासे काढून टाकण्याचे काम महापालिकेचे कर्मचारी करीत आहेत. मरण पावलेले मासे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की ते काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली.

घातपाताची शक्यतागोदावरी नदी पात्रात अशाप्रकारची घटना घडण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीदेखील अशाप्रकारे मासे मरण पावले होते. परंतु, त्याचे कारण मिळालेले नाही. पाण्यात कोणतेही केमिकल मिळाले नाही. परंतु, पाण्यात डीओचे प्रमाण कमी होते. मात्र त्यामुळे मासे मरत नाहीत. यंदादेखील तशाचप्रकारे मासे मरण पावले असून पाण्याचे नमुने घेतले आहेत. मृत माशाचे अवशेषही तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. त्यामुळे तपासणीनंतरच माशांच्या मृत्यूचे कारण पुढे येईल. पाणी दुर्गंधीयुक्त असते तर आजपर्यंत त्या पाण्यात माशांची वाढ झालीच नसती, असे वाटते. अचानकपणे अशाप्रकारे लाखो मासे मृतावस्थेत आढळणे ही घातपाताची शक्यता वाटते. तरीदेखील आम्ही नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठविले असून लवकरच माशांच्या मृत्यूचे कारणही पुढे येईल.- आर. यु. पाटील, उपप्रादेशिक अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नांदेड.

टॅग्स :Nandedनांदेडgodavariगोदावरी