शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

मुखेड तालुक्यात सौर पथदिव्यावरील लाखो रुपये पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:02 AM

तालुक्यातील १२८ ग्रामपंचायती अंतर्गत १५२ गावामध्ये नागरिकांना भौतिक सुविधा देण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन सौर पथदिवे बसवून विद्युत बचतीवर मात करण्याचा प्रयत्न झाला, मात्र सौर पथदिव्यांची दयनीय अवस्था आहे. यामुळे लाखोंचा खर्च वाया गेला.

दत्तात्रय कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कमुखेड : तालुक्यातील १२८ ग्रामपंचायती अंतर्गत १५२ गावामध्ये नागरिकांना भौतिक सुविधा देण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन सौर पथदिवे बसवून विद्युत बचतीवर मात करण्याचा प्रयत्न झाला, मात्र सौर पथदिव्यांची दयनीय अवस्था आहे. यामुळे लाखोंचा खर्च वाया गेला. मोहीम राबविणारे ग्रामसेवक, सरपंच आणि वस्तू पळविणारे मात्र मालामाल झाले.पंचायत समितीच्या तालुक्यातील अभिलेखावरुन सन २०१६-१७ मध्ये कलंबर ३ लाख ५ हजार ७२१ रुपये, कुंद्राळ १ लाख ८९ हजार ५०० रुपये, कोटग्याळ २ लाख ७३ हजार ५०० रुपये, खैरका २ लाख ७९ हजार ९९० रुपये, माकणी १ लाख १६ हजार ७०० रुपये, रावी ३ लाख ९६ हजार ९०० रुपये, लादगा २ लाख २७ हजार ४०० रुपये, जांब खु. १९ हजार रुपये, जांबळी १ लाख ८६ हजार ७५० रुपये, तारदडवाडी १ लाख ४५ हजार २५० रुपये, दापका राजा २ लाख ८४ हजार २५० रुपये, नंदगाव प.क. १ लाख ३७ हजार ५० रुपये, फुटकळवाडी २ लाख ७० हजार रुपये, शिरुर दबडे २ लाख ८४ हजार २५० रुपये, सलगरा खु. २ लाख २६ हजार ८०० रुपये, सावरमाळ २ लाख ९५ हजार रुपये, हसनाळ प.दे. २ लाख २७ हजार ४०० रुपये असे एकूण सन १६-१७ मध्ये सौर उर्जेवर एकूण ३७ लाख, ७९ हजार १६१ रुपये खर्च झाला आहे.तर सन २०१७-१८ मध्ये धामणगाव २लाख ७७ हजार ५५० रुपये, कामजळगा ८० हजार व २ लाख ३९ हजार ४०० रुपये, खैरका ६३ हजार ६०० रुपये, मांजरी ३ लाख २८ हजार ७६७ रुपये, उमरदरी १ लाख ४८ हजार ४०० रुपये, कोळनुर ७६ हजार ५९७ रुपये, परतपुर ५८ हजार ३५० रुपये, सुगाव बु. २ लाख ४९ हजार ५०० रुपये, सुगाव खु..५८ हजार ५३० रुपये, निवळी ५९ हजार रुपये, उंद्री प.मु. १ लाख ३८ हजार ८५३ रुपये, खतगाव प.दे. १ लाख ४८ हजार ७५० रुपये, भाटापुर प.दे. ६४ हजार ५७५ रुपये, बावनवाडी २ लाख ९६ हजार ८०० रुपये, बामणी २ लाख ९९ हजार ४२० रुपये, कोळगाव १ लाख १८ हजार ५०० रुपये, कर्णा १ लाख ७७ हजार ७५० रुपये असा एकूण २८ लाख ८४ हजार ०४२ एवढा खर्च झाला़ खर्च तर दोन वर्षातला एकूण खर्च ६६ लाख ६३ हजार २०३, असे एकूण ३४ गावे आहेत. तर इतर गावांची शासकीय अभीलेखात नोंद नाही. गावातील सौर दिवे मोडकळीस आले. काही सौर दिवे बंद, काही लहानसा प्रकाश असे आहेत़ काहींच्या बॅटऱ्या चोरट्यांनी पळविल्या़ तर काही खांबाचे बल्ब चोरले काही खांब रिकामेच़ ना बल्ब ना बॅटरी़तालुक्यात ९० टक्के सौर पथदिवे बंद तर १० टक्के सौर पथदिवे चिमणीच्या प्रकाशासारखे टिमटिमताना दिसतात़ फक्त नावालाच सौर दिवा. एका दिव्यामागे २४ ते २५ हजार रुपये खर्चून सगळा पैसा पाण्यात गेला. यात मात्र ग्रामसेवक, सरपंच व चोरी करणारे चोर हे मात्र मालामाल झाले.

टॅग्स :Nandedनांदेडelectricityवीजfundsनिधी