नांदेड- कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज सकाळी नांदेड जिल्ह्यातील कासारखेडा, नांदुसा येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी सत्तार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत खरीप पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला.
अब्दुल सत्तारांनी आढावा घेतल्यानंतर लवकरात लवकर पंचनामे पुर्ण करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. सत्तार यांच्यासोबत आमदार बालाजी कल्याणकर, प्रभारी जिल्हाधिकारी परदेशी यांसह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.