नांदेड - शेतकऱ्यांचे कृषी कर्ज पुनर्गठन न करणे, कर्ज न देणे, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करणे असा मनमानी कारभार चालवत शासनाचे ध्येयधोरणे पायदळी तुडविणाऱ्या महाराष्ट्र बँकेविरुद्धमनसेने आज बोंबमारो आंदोलन केले. मनसेच्या आंदोलनामुळे बँक प्रशासनाचे धाबे दणाणले .
महाराष्ट्र बँक प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. जिल्हाधिकारी यांच्याही आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर असताना, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असतानाही शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली केली जात आहे. विशेष बाब ही की कर्ज वसुलीच्या पावत्या दिल्या जात नाहीत. हा सगळा प्रकार शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक कोंडी करणारा आहे असा आरोप करत मनसेने आज या विरोधात बोंब मारो आंदोलन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागीरदार, शहराध्यक्ष शफिक अब्दूल , संतोष सुनेवाड, मनविसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील बरडे, महिला जिल्हा अध्यक्ष सुरेख पाटील, गजानन चव्हाण, राज अवननी, शक्ती परमार, बालाजी एकलारे, महेश ठाकूर, अनिकेत परदेशी, अंकित तेहरा, शिवराज पाटील, विशाल जोरगेवार, सुरज ठाकूर, पपू मनसुके, शंकर सरोदे, प्रसाद कदम, राजू ठाकूर , प्रशांत इंगोले, उषा नरवाडे, उमा सूर्यवंशी, करुणा शेंडेराव,सागर मंडलापूरे, सीमा सूर्या, ज्योती मोरे, राणी वाघमारे, ज्योती चव्हाण , माया चव्हाण, वंदना गायकवाड, रुख्मिणीबाई दुधकवाडे, रंजना भवरे, वैशाली मदने, अहिल्या खेडकर, छायाबाई खांडेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.