लाॅकडाऊनपूर्वी मुलांच्या हातात मोबाईल होता; परंतु त्याचा वापर कमी वेळेपुरता होत असे. परंतु आता ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या हातात आठ, आठ तास मोबाईल असतो. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. डोळ्यांचे, डोक्याचे आजार वाढले आहेत. मोबाईल गेममध्ये अडकलेल्या मुलांमध्ये अनेक बदल झाले असून, मुलांचा आत्मविश्वास कमी झाला आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे हाती आलेल्या मोबाईलचे व्यसन मुलांना लागल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
विटी-दांडू गायब
चौकट - पूर्वी शालेय विद्यार्थ्यांसाठी मैदानी खेळांना महत्त्व होते. मैदानी खेळांमुळे व्यायाम होत असे. त्यामुळे मुलांचे आरोग्य चांगले राहत होते. विटी-दांडू, कबड्डी, धावणे असे कितीतरी मैदानी खेळ मुले खेळायचे; परंतु आता या खेळाची ओळख आताच्या मुलांना राहिली नसल्याचे सोपानराव कदम यांनी सांगितले.
चौकट- ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. मुले सात, आठ तास मोबाईल पाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांच्या समस्या वाढल्या असून, डोकेदुखी, मानदुखीचे आजारही वाढले आहेत. मुलांमध्ये रागीटपणा वाढला असून, शिघ्रकोपी बनले आहेत. स्मरणशक्ती कमी झाली असून, तळमळ वाढली आहे. मोबाईलवरील गेममुळे न्यूनगंड निर्माण होत चालला आहे. - डॉ. रामेश्वर बोले, मानसोपचार तज्ज्ञ, नांदेड