भोकर (जि. नांदेड) : पत्नीचे नाक कापून फरार झालेल्या व वेषांतर करून साधू म्हणून राहणाºया आरोपीला तब्बल २३ वर्षांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. नामदेव येडे असे त्याचे नाव असून तो माहूर येथील गडावर छगन भारती या नावाने अनेक वर्षांपासून साधू म्हणून वावरत होता.मुदखेड तालुक्यातील नामदेव किशन येडे याने २३ नोव्हेंबर १९९४ रोजी किरकोळ वादातून भोकर शहरातील रेल्वे स्थानकाजवळ चाकूने पत्नीचे नाक कापले होते. याप्रकरणी त्याची पत्नी शोभाबाई यांच्या फिर्यादीवरून भोकर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. तेव्हापासून नामदेव पसार होता. तो गडावर साधूच्या वेशात राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
पत्नीचे नाक कापून पसार झालेला बनला साधू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 4:14 AM