भोकर (नांदेड) : पत्नीचे नाक कापून फरार झालेला व वेषांतर करुन साधू म्हणून राहणार्या आरोपीला तब्बल २३ वर्षांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. माहूर येथील गडावर नामदेव येडे हा आरोपी छगन भारती या नावाने मागील अनेक वर्षांपासून साधू म्हणून वावरत होता.
मुदखेड तालुक्यातील वासरी येथील नामदेव किशन येडे याने २३ नोव्हेंबर १९९४ रोजी पत्नीस ‘तू मेहुण्याच्या शेतात कामावर का जातेस?’ म्हणून भोकर शहरातील रेल्वे स्थानकाजवळ वाद घालून तिचे चाकूने मुदखेड तालुक्यातील वासरी येथील नामदेव किशन येडे याने २३ नोव्हेंबर १९९४ रोजी पत्नीस याप्रकरणी त्याची पत्नी शोभाबाई येडे यांनी भोकर पोलिसांत नामदेव येडे याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. यावरुन नामदेव येडे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून नामदेव येडे हा फरार झाला होता.
दरम्यान, स्थानिक गुन्हा शाखा नांदेडचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या पथकास नामदेव येडे हा माहूर येथील गडावर साधूच्या वेषात राहत असल्याची माहिती मिळाली. यावरुन स्था.गु.शा.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक काशीद, पोहेका हंबर्डे, शिंदे, चालक कानगुले यांच्या पथकाने रविवारी त्याच्यावर पाळत ठेवून त्यास दत्त शिखर, माहूरगड येथून ताब्यात घेतले. आरोपी नामदेव येडे हा माहूर मधील दत्तगड येथे आपले नाव बदलून छगन भारती या नावाने साधूचे वेषांतर करुन राहत होता. आरोपीस सोमवारी भोकर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पो.नि. आर.एस. पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.नामदेव जाधव करीत आहेत. दरम्यान, भोकर पोलीसांनी आरोपीस येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.