शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

बहुतांश रेल्वेगाड्या आता प्लॅटफार्म चारवरून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 1:55 PM

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे कार्यालयाने प्रवासी तसेच लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन नांदेड स्थानकातून धावणार्‍या महत्त्वपूर्ण रेल्वेगाड्या प्लॅटफार्म क्रमांक ४ वरून सोडण्याचा निर्णय घेतला़

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे कार्यालयाने प्रवासी तसेच लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन नांदेड स्थानकातून धावणार्‍या महत्त्वपूर्ण रेल्वेगाड्या प्लॅटफार्म क्रमांक ४ वरून सोडण्याचा निर्णय घेतला़  यामध्ये एकूण सहा रेल्वेगाड्यांचा समावेश आहे़  

नांदेड येथून मुंबईकडे धावणार्‍या गाड्या प्लॅटफार्म क्रमांक दोन आणि तीनवरून सोडण्यात येत असल्याने वृद्ध व्यक्ती, स्थानिक लोकप्रतिनिधी, रूग्णांना अडचणींचा सामना करावा लागत होता़ तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येणार्‍या प्रवाशांना वजिराबाद चौरस्ता, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील वाहतूक कोंडीचा सामना करत स्थानक गाठावे लागते़ तसेच ऐन स्थानकासमोरून एसटी महामंडळाच्या बसेसदेखील धावत असल्याने येथील परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी झालेली असते़ त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांची गाडी सुटल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत़  तर हीच अवस्था वृद्ध व्यक्ती, दिव्यांगांचीदेखील होती़ त्यामुळे नांदेडातून धावणार्‍या महत्त्वपूर्ण रेल्वे   प्लॅटफॉर्म चारवरून सोडाव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत झालेल्या खासदारांच्या बैठकीत केली होती़  

लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन नांदेड रेल्वे प्रशासनाने ७ मार्चपासून काही गाड्यांचे प्लॅटफार्म बदलण्याचा निर्णय घेतला आहे़ यात सुपरफास्ट आणि एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे़ सदर गाड्या महत्त्वपूर्ण रेल्वे म्हणून ओळखल्या जातात़ यामध्ये सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस, नांदेड-तिरुपती एक्स्प्रेस, नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस, नांदेड-पनवेल एक्स्प्रेस, धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस, पूर्णा -पाटना एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे़  सदर गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून धावणार आहेत़  गोकुळनगर परिसरात वाहनांची गर्दी कमी असल्याने कमी वेळेत स्थानकात पोहोचणे शक्य होईल़ 

चव्हाणांचा पाठपुरावानांदेड स्थानकातील प्लॅटफार्म एकवर येणार्‍या प्रवाशांना वजिराबाद चौक, डॉ़बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो़ वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे अनेकवेळा प्रवाशांची गाडी सुटते़ त्यामुळे नांदेड स्थानकातून धावणार्‍या महत्त्वपूर्ण गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरून सोडाव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी रेल्वे बोर्ड, दमरेचे महाव्यवस्थापक आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे सातत्याने केली़ दरम्यान, नांदेड विभागाने मंगळवारी वेळापत्रकात केलेल्या बदलामुळे खा़ चव्हाणांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीNandedनांदेड