नांदेड : जिल्ह्यात मतदारयाद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात १ लाख १४ हजार ६७९ मतदारांनी नोंदणी केली आहे. तर १६ हजार ५३२ मतदारांनी नाव वगळणीसाठी अर्ज केले आहेत. या पुनरिक्षण कार्यक्रमानंतर जिल्ह्यात जवळपास ९५ हजार मतदार वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात नावनोंदणीसाठी आलेल्या अर्जांची संख्या ही नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक असल्याची बाब पुढे आली आहे. अंतिम मतदारयादी ही ११ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे.जिल्ह्यात १ नोव्हेंबर २०१९ या अर्हता दिनाकांवर आधारित मतदारयाद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात १ लाख १४ हजार ६७९ अर्ज हे मतदारयादीत नाव नोंदणीसाठी प्राप्त झाले होते. तर वगळणीसाठी १६ हजार ५३२ मतदारानी अर्ज केले. मतदारयादीतील नाव व इतर बाबींच्या दुरुस्तीसाठी ५८ हजार ८०० अर्ज प्राप्त झाले. तर पत्ता बदलासाठी ३ हजार ४४६ मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत.या कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात जवळपास ९५ हजार मतदारांची वाढ होणार आहे. १६ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्र सहायक यांची बैठक झाली.या बैठकीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत १ सप्टेंबर २०१८ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत प्राप्त झालेल्या नावनोंदणी, वगळणी, दुरुस्ती तसेच पत्ता बदल अर्जांची माहिती देण्यात आली. तसेच मतदान केंद्र सहायक आणि उपस्थित मतदारांचे दावे, हरकतींची नोंद घेण्यात आली.१ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांना २५ जानेवारी या राष्टÑीय मतदार दिवशी निवडणूक ओळखपत्र देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.लोहा मतदारसंघात सर्वात कमी नावनोंदणीसर्वाधिक नावनोंदणी ही नांदेड उत्तर मतदारसंघात झाली आहे. या मतदारसंघात २० हजार १८२ मतदारांनी नावनोंदणीसाठी अर्ज केला. तर सर्वात कमी नावनोंदणी लोहा मतदारसंघात झाली असून येथे ८ हजार ८२२ मतदारांनी नावनोंदणी केली आहे.किनवट मतदारसंघात १२ हजार ५१९, हदगाव मतदारसंघात १३ हजार ६६८, भोकर मतदारसंघात ११ हजार १२८, नांदेड दक्षिण मतदारसंघात १३ हजार ९२७, नायगाव मतदारसंघात १० हजार २८३, देगलूर मतदारसंघात १२ हजार ६६८ आणि मुखेड मतदारसंघात ११ हजार ४८२ मतदारांनी नावनोंदणीसाठी अर्ज केले.सार्वजनिक ठिकाणीही प्रात्यक्षिकईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या जनजागृतीसाठी होणाºया प्रात्यक्षिक कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रांतील नागरिकांसाठी स्वतंत्ररित्या प्रात्यक्षिक होईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. वकील, डॉक्टर्स, व्यापारी, मनपा, जिल्हा परिषद सदस्य, पोलीस यांच्यासाठीही प्रात्यक्षिक केले जाणार आहे. त्याचवेळी बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी सार्वजनिक ठिकाणीही हे प्रात्यक्षिक दाखविले जाईल. यातून सर्व क्षेत्रांतील नागरिकांना व्हीव्हीपॅटची माहिती होणार आहे.ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे होणार प्रात्यक्षिकजिल्ह्यात ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटच्या जनजागृतीसाठी २१ डिसेंबरपासून प्रात्यक्षिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात १९ पथकांद्वारे हे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे.जवळपास ४५ ते ५० दिवस जिल्ह्यातील सर्व गावे, वाडी-तांडे, शहरांमध्ये होणाºया प्रात्यक्षिक पथकामध्ये नायब तहसीलदार प्रमुख राहणार आहेत. १९ मोबाईल व्हॅनद्वारे प्रात्यक्षिक केल्या जाणाºया या पथकामध्ये एक मंडळ अधिकारी, दोन तलाठी, एक मास्टर ट्रेनर आणि एक पोलीस कर्मचारी अशा सहा जणांचा समावेश आहे.या प्रात्यक्षिकाकरिता १९ पथकांसाठी एकूण ३८ बॅलेट युनिट, ३८ कंट्रोल युनिट आणि ३८ व्हीव्हीपॅट यंत्र वापरले जाणार आहेत. एका दिवशी तीन गावांमध्ये प्रात्यक्षिक दाखविले जाईल. प्रात्यक्षिकासाठी वापरण्यात येणाºया ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट यंत्र त्या त्या तालुक्यात पोलीस बंदोबस्तात स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी दीपाली मोतीयाळे यांचीही उपस्थिती होती.
सर्वाधिक मतदार नोंदणी नांदेडमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 1:01 AM
या पुनरिक्षण कार्यक्रमानंतर जिल्ह्यात जवळपास ९५ हजार मतदार वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात नावनोंदणीसाठी आलेल्या अर्जांची संख्या ही नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक असल्याची बाब पुढे आली आहे. अंतिम मतदारयादी ही ११ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे.
ठळक मुद्देजिल्हाभरात मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक ११ जानेवारीला अंतिम मतदारयादी होणार प्रसिद्ध