दरम्यान चंद्रभागाबाईची सून लक्ष्मीबाई पावडे व तिचा पती रमेश पावडे यांच्या बँकेतून २० हजार रुपये काढून कोणाला तरी दिले होते. याबाबत रमेश विचारणा करीत होता. त्या पैशाची भरपाई करण्यासाठी लक्ष्मीबाई पावडे व तिची सून रोहिणी यांनी ६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चंद्रभागाबाई पुरभाजी पावडे (वय ७०) हीस दवाखान्यात जाण्याचा बहाना करुन दोघींनी पावडेवाडी शिवारातून जात असलेल्या नाल्यात नेवून चंद्रभागाबाई यांचा गळा आवळून व हातपाय बांधून खून केल्यानंतर तिचा मृतदेह बाभळीच्या झुडपात असलेल्या नाल्यात फेकून दिला.यावेळी आरोपींनी वृद्ध महिलेच्या कानातील ६ ग्रॅमच्या बाळ्या, दोन मनी व सोन्याचे पान काढून घेवून सराफा बाजार येथे एका व्यापाऱ्याकडे विक्री करुन आलेले २० हजार रुपये रमेश पावडे यास परत केले. सदर वृद्ध महिला हरवल्याची नोंद केल्यानंतर मयत महिलेची मुलगी ज्योती कल्याणकर व दोन मुलांनी शोध घेतला असता चंद्रभागाबाईचा मृतदेह नाल्यात आढळून आला. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळूंके व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळीला भेट देवून पंचनामा केला. या प्रकरणी ज्योती कल्याणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिसांनी सून व नातसुनेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघींनाही अटक केली आहे. त्या दोनचही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १२ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खून प्रकरणात सासू-सुनेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:17 AM