महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी हे सर्वजण हिमायतनगर शहरात एक दिवस एका वार्डातील वीजपुरवठा संदर्भात समस्या चे हाल करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. ग्राहकांच्या अडीअचणी समजून घेऊन ग्राहकांच्या काही समस्या लाईट बिल, वीज पुरवठा आडवे खांब व इतर कामे शहरातील ग्राहकांच्या तक्रारी संदर्भात हिमायतनगर शहरातील बजरंग चौक येथील वार्ड क्रमांक १ मधून प्रारंभ करण्यात येणार आहे त्या वार्डातील विज पुरवठा दिवस भर बंद रहात असल्याने या साठी शहरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे अहवान महावितरणचे सहाय्यक अभियंता उपकार्यकारी अभियंता लोणे, पी.पी.भडंगे यांनी केले आहे.
यावेळी वरिष्ठ तंत्रज्ञ पी.जी.शिंदे , एस.एस. आडेराव, यु.जी. ढगे, आर. ए. बक्केवाड, आ.ए.सिद्धनाथ आदी कर्मचारी या मोहिमेत सहभागी राहणार आहेत.