केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा कसलाही विचार न करता शेतकरीविरोधी विधेयके जाणीवपूर्वक शेतकऱ्यावर लादण्यात आली आहेत. ती शेतकरीविरोधी विधेयके रद्द करा, या मागणीचे निवेदन यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष माधव पाटील कदम, काँग्रेस तालुका अध्यक्ष उद्धवराव पवार यांच्या नेतृत्वाखाली ना. तहसीलदार संजय भोशीकर यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे.
या शेतीविरोधी विधेयकांमुळे देशातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधी पारित केलेली विधेयके तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यावा. याविरोधी विधेयकाचा विरोधात देशातील व राज्यांमधील सर्व शेतकरी केंद्र शासनाच्या विरोधात तीव्रपणे आंदोलन करीत आहेत; परंतु केंद्र शासनाने हे विधेयक अद्यापही रद्द केले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. यावरून असे लक्षात येते की, केंद्र शासनाला शेतकऱ्याचे कसलीही घेणे-देणे नाही. त्यामुळे याबाबत सदर सदरील शेतकरीविरोधी विधेयकाचा मुदखेड शहर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे. केंद्र शासनाने तातडीने शेतकरीविरोधी विधेयके रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष उद्धवराव पवार, काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष माधव पाटील कदम, नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार, सभापती म्हैसाजी भांगे, संचालक भीमराव कल्याणे, माधवराव शिंदे, किशनराव मुंगल, नागोराव जाधव, श्रीराम पाटील आदींसह शेतकरी, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.