जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहा दिवसांत गऊळ येथील नियोजित जागेवर कॉ.आण्णा भाऊंचा पुतळा बसविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत व्हिडीओ कॉल करून जाहीर बैठकीत ७ सप्टेंबर रोजी सर्वांसमक्ष दिले होते. या वेळी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर आदींची प्रमुख उपस्थिती होती. परंतु, आजपर्यंत पुतळा बसविला नाही व इतर मागण्या संदर्भात प्रशासनाने गांभीर्यांने लक्ष दिले नाही म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २१ सप्टेंबर रोजी कॉ.आण्णा भाऊ पुतळा नांदेड येथून मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे मोर्चाऐवजी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात हजारो लोक सहभागी झाले होते.
गऊळ अण्णा भाऊ साठे पुतळा विटंबना व अमानुष लाठीचार्ज निषेध मोर्चा कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे, भाजपा अनु.जा.मोर्चा चे राज्य उपाध्यक्ष मारोती वाडेकर, लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ.गंगाधर गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गणेश तादलापूरकर, शंकरराव तडाखे, लाल सेनेचे कॉ.गणपत भिसे, बहुजन रयत परिषदेचे रमेश गालफाडे, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक माधव डोम्पले, भाकप युनायटेडचे प्रा.इरवंत सुर्यकार, नागोराव आंबटवार, मास सामाजिक संघटनेचे सूर्यकांत तादलापूरकर, ब.र.प.चे साहेबराव गुंडीले, वंचित बहुजन आघाडीचे शिवा नरंगले, श्याम कांबळे,प्रशांत इंगोले, प्रा.राजू सोनसळे,बहुजन समाज पक्षाचे मनिष कावळे आदींनी आपल्या मनोगतातून केंद्र आणि राज्य सरकारचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.
दरम्यान, विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यामध्ये गऊळ येथील मातंग समाजातील व्यक्तींवर दाखल केलेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, मौजे गऊळ येथे लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊंचा पुतळा नियोजित जागेवर पुनर्स्थापित करून बसविण्यात यावा, या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून संबंधित आरोपीवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करावेत, आदी मागण्यांचा समावेश आहे. आंदोलन यशस्वितेसाठी लहुजी शक्ती सेनेचे नागोराव आंबटवार, मानवहित लोकशाही पक्षाचे मालोजी वाघमारे, भारतीय लहुजी सेनेचे रणजित बाराळीकर, मासचे सुर्यकांत तादलापूरकर, नितीन वाघमारे, माधव डोम्पले, व्ही.जे.डोईवाड, प्रा.इरवंत सुर्यकर, प्रदीप वाघमारे, रवींद्र भालेराव, प्रीतम गवाले, मा.मा.गायकवाड, कॉ.संतोष शिंदे, माकपचे कॉ.मारोती केंद्रे,कॉ.जयराज गायकवाड, प्रा.कॉ. देविदास इंगळे, डॉ.मारोती शिकारे, अभिजित हळदेकर, कॉ.आंबादास भंडारे, कॉ.प्रा.राज सूर्यवंशी, हणमंत माळेगावकर, गजानन सी. गायकवाड,मंगेश देवकांबळे गऊळकर आदींनी प्रयत्न केले.