महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी शहरातील मालमत्ताधारकांकडून चालू व थकीत मालमत्ता करवसुलीबाबत कडक अंमलबजावणी करणे बाबत बैठकीत आदेश दिले होते. त्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयात करवसुली मोहीम हाती घेण्यात आली. त्यासाठी थकबाकीदार यांचे नळ खंडित करणे, ड्रेनेज खंडित करणे, मालमत्ता जप्त करण्याबाबत कारवाई करण्यात येत आहेत.
१४ मार्चला क्षेत्रिय कार्यालय क्रमांक १ च्यावतीने मालमत्ताधारकाकडून ५ लक्ष ४५ हजार कर थकीत असल्याने संबंधिताचे ३५ मोकळे भूखंड जप्त व दुसऱ्या मालमत्ताधारकाचा १ नळ खंडित करण्यात आला.
१० ते १३ मार्चपर्यंत १७६ मोकळे भूखंड जप्त, नळ खंडित, ड्रेनेज खंडित करण्याची कारवाई केली होती.
ही कारवाई आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशानुसार करनिर्धारक व मूल्यसंकलन अधिकारी अजितपालसिंघ संधु यांच्या नियंत्रणाखाली क्षेत्रिय अधिकारी संजय जाधव व त्यांच्या पथकातील कर्मचारी यांनी या मोहिमेत भाग घेतला.
शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या चालू व थकीत मालमत्ता कर भरून सहकार्य करावे व अप्रिय घटना टाळावी, असे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.