शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

नगरपालिकांचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 12:39 AM

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले़ त्यामुळे कामकाज ठप्प झाले होते़ या संपामध्ये उमरी, कंधार, धर्माबाद, हिमायतनगर, मुदखेड,बिलोली, माहूर, लोहा पालिकेतील कर्मचा-यांचा समावेश होता़

ठळक मुद्देवर्षाच्या पहिल्या दिवशी संप : उमरी, कंधार, धर्माबाद, बिलोली, हिमायतनगर, मुदखेड, माहूर, लोहा

नांदेड : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले़ त्यामुळे कामकाज ठप्प झाले होते़ या संपामध्ये उमरी, कंधार, धर्माबाद, हिमायतनगर, मुदखेड,बिलोली, माहूर, लोहा पालिकेतील कर्मचा-यांचा समावेश होता़उमरी येथे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी-संवर्ग कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी न.प.कर्मचारी संघटना अध्यक्ष विश्वनाथ घुगे, रामेश्वर वाघमारे, मारोती गायकवाड, बलभीम शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात करण्यात आली़ त्यामुळे आज सकाळपासूनच पाणीपुरवठा स्वच्छता आधी विभागाचे काम ठप्प झाले. याप्रसंगी अध्यक्ष श्रीनिवास अनंतवार, उपाध्यक्ष गणेश मदने, हमीद अन्सारी, सचिन गंगासागरे, शंकर डोप्पलवार, शंकर पाटील यांची उपस्थिती होती़बिलोली येथे २९, ३० व ३१ डिसेंबर रोजी काळी फित लावून निषेध केला होता़ मंगळवारी कर्मचारी संपावर गेले आहेत. यावेळी अध्यक्ष संग्रामसिंग चौव्हान, सचिव अशोक स्वामी, कोषाध्यक्ष राम गादगे, उपाध्यक्ष गणेश फाळके, गुलाम एसदानी, भीम कुडके यांच्यासह माधवराव पाटील उपस्थित होते़लोहा येथे संपात संघटनेचे अध्यक्ष गोविंद काळे, अंजना गवळी, सोमनाथ केंद्रे, चांदू राजकौर, शंकर वाघमारे, बळीराम पवार, किशन दांगटे, नंदकिशोर अंकले, प्रकाश मोरे, बालाजी फरकंडे, नीळकंठ निर्मले, आनंद भातलवंडे आदी सहभागी झाल्याची माहिती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव केंद्रे यांनी दिली़कंधार येथे आंदोलनात सरचिटणीस जितेंद्र ठेवरे, मष्णाजी उलेवाड, मनोहर पारेकर, शरद राहेरकर, सुलतान रज्जाक, बालाजी अंकमवार, पिल्केवार, नागनाथ साळवे, दत्ता ऐनवाड, शंकर मोरे, सतिश बडवणे, रमेश कळसकर, खमर पठाण, अझहर युनुस यांचा सहभाग होता़धर्माबादेत अध्यक्ष विश्वनाथ घुगे, सरचिटणीस रामेश्वर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत मोकले, उपाध्यक्ष माधव कद्रेकर, सचिव भीमराव सूर्यवंशी, कोषाध्यक्ष मारोती उल्लेवाड, बाबू केंद्रे, वंसत पुतळे, दत्तु गुरजलवाड, स्वामी राजू गुरूलिंग यांनी आंदोलनात सहभाग घेतला़मुदखेडमध्ये कर्मचारी संपावर गेल्यामुळे न. प. कार्यालयीन कामकाज ठप्प होते. या संपात न.प.कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पिराजी जगताप, गंगाधर भिसे, मोहन कवळे,दिलीप पवार,शेख युनूस, रमेश सावंत, राहुल चौदंते, रामचंद्र पहिलवान, अशोक रड्डेवार उपस्थित होते़ माहूर नगरपंचायत कर्मचा-यांच्या संपामुळे पहिल्या दिवशीच कामे खोळंबली. वैजनाथ स्वामी, देवीदास सिडाम, सुनील वाघ, गंगाधर दळवे, शेख मझर, देवीदास जोंधळे हे सहभागी झाले होते़काय आहेत मागण्या...१ जानेवारीपासून विनाअट सातवा वेतन आयोग लागू करावा, १९९३ व २००० पूर्वीचे सर्व रोजंदारी कर्मचारी ३१ डिसेंबर २०१८ पूर्वी कायम करण्यात यावेत, सफाई कामगारांना व त्यांच्या वारसांना वरिष्ठ पदावर पदोन्नती देणे, मोफत घरे बांधून देणे, सफाई विभागाची ठेका पद्धत बंद करणे, सफाई आयोगाच्या अहवालाची तात्काळ अंमलबजावणी करणे आदींसह इतर मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे़

टॅग्स :NandedनांदेडagitationआंदोलनEmployeeकर्मचारी