लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड : नांदेड ते लातूर महामार्गावरील जीवघेणे खड्डे चुकविताना कंटेनरने स्कुटीला जबर धडक दिल्याने ४० वर्षीय महिला जागीच ठार झाली, तर तिचा स्कुटीचालक २० वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर उपचार सुरु असताना मरण पावला. ही घटना १९ फेबु्रवारी रोजी सकाळी वसरणी परिसरात घडली.रेखा पवार असे मयत महिलेचे नाव असून संतोष पवार (वय २०) असे तिच्या मुलाचे नाव आहे. एमएच २६ बीएच ४४६३ या क्रमांकाच्या स्कुटीवरुन संतोष हे आईला घेवून मजुरीच्या कामासाठी निघाले होते. याच दरम्यान दूधडेअरी ते डॉ. आंबेडकर चौकाकडे जाणा-या रस्त्यावरील सीजी ०७ सी-३५३८ या क्रमांकाच्या कंटेनरने स्कुटीला धडक दिली. या अपघातात डोक्यावरुन चाक गेल्याने रेखा पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर संतोष पवार जखमी झाले, त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान, जखमी संतोष यांचा सोमवारी सायंकाळी मृत्यू झाल्याचे नापोकॉ ज्ञानोबा केंद्रे यांनी सांगितले.घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस निरीक्षक एस.एस. आम्ले यांनी संतप्त नागरिकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ग्रामीण पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, फौजदार बी.बी. पवार, पोकॉ ज्ञानोबा केंद्रे तपास करीत आहेत.
माय-लेकाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:57 AM
नांदेड ते लातूर महामार्गावरील जीवघेणे खड्डे चुकविताना कंटेनरने स्कुटीला जबर धडक दिल्याने ४० वर्षीय महिला जागीच ठार झाली, तर तिचा स्कुटीचालक २० वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर उपचार सुरु असताना मरण पावला. ही घटना १९ फेबु्रवारी रोजी सकाळी वसरणी परिसरात घडली.
ठळक मुद्देवेगातील कंटेनरची स्कुटीला धडक