नायगाव परंपरागत काँग्रेसच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:29 AM2019-07-03T00:29:43+5:302019-07-03T00:30:35+5:30

विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेल्या दोन निवडणुकांत नायगाव मतदारसंघ हा काँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठीशी राहिलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नायगाव मतदारसंघात भाजपाला २० हजार मताधिक्य मिळाले.

Naigaon backs traditional Congress | नायगाव परंपरागत काँग्रेसच्या पाठीशी

नायगाव परंपरागत काँग्रेसच्या पाठीशी

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत भाजपला नायगावमध्ये मिळाले २० हजारांचे मताधिक्य

बी. व्ही. चव्हाण।
उमरी : विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेल्या दोन निवडणुकांत नायगाव मतदारसंघ हा काँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठीशी राहिलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नायगाव मतदारसंघात भाजपाला २० हजार मताधिक्य मिळाले. असे असले तरी हा मतदारसंघ नेहमी काँग्रेस व समविचारी पक्षांच्या पाठीशी राहिल्याचे दिसून येते.
नायगाव विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर नायगावसह उमरी व धर्माबाद असे तीन तालुके त्यात समाविष्ट करण्यात आले. सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार वसंतराव चव्हाण हे ६ हजार मताधिक्य घेऊन विजयी झाले. यावेळी सेनेचे उमेदवार बाबाराव एंबडवार हे मोठ्या फरकाने पराभूत झाले. विशेष उल्लेखनीय म्हणजे यावेळी राम पाटील रातोळीकर यांना भाजपाने उमेदवारी देऊ केली होती. मात्र त्यांनी ही उमेदवारी नाकारली. म्हणून अपक्ष उमेदवार वसंतराव चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्यात सरळ लढत झाली. निवडून आल्यानंतर वसंतराव चव्हाण हे काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले.
मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात आ. वसंतराव चव्हाण यांनी या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. यावेळी काँग्रेस व राष्टÑवादी स्वतंत्र लढले. तरीही वसंतराव चव्हाण हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. यावेळी त्यांनी भाजपाचे राजेश पवार यांचा पराभव केला. यावेळच्या मोदी लाटेचा या मतदारसंघात बराच फरक जाणवला. नवखे असणाऱ्या राजेश पवारांनी येथे शेवटपर्यंत चांगलीच झुंज दिली. सलग दुसऱ्यांदा यावेळी बापूसाहेब गोरठेकरांचा पराभव झाला. त्यासोबतच काँग्रेस-राष्टÑवादीतील राजकीय वैमनस्य उफाळून आले. राष्टÑवादी काँग्रेसची भाजपाशी असलेली मैत्री उघडपणे दिसून आली. राष्टÑवादीच्या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी उघडपणे भाजपाचा प्रचार केला. असे अनेक घटक काँग्रेस उमेदवारांच्या पराभवासाठी येथे कारणीभूत ठरले. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आ. वसंतराव चव्हाण हे काँग्रेसतर्फे रिंगणात राहणार आहेत. तशी तयारीही त्यांनी सुरु केली आहे. भाजपाकडून राजेश पवार व मीनलताई खतगावकर ही नावे आघाडीवर आहेत. राजेश पवार यांनी गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघात संपर्क कायम ठेवला. वंचित बहुजन आघाडीकडून भावी उमेदवारीबाबत अजूनतरी कुणाचे नाव पुढे आलेले नाही. मात्र या मतदारसंघातील मतांचे जातनिहाय समीकरण लक्षात घेता लिंगायत, मनेरवारलू अथवा कोळी समाजातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. पक्षीय पातळीवर त्यादृष्टीने चाचपणी सुरू असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून मिळते आहे.

Web Title: Naigaon backs traditional Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.