नायगाव तालुक्यात ६८ ग्रामपंचायतच्या निवडणूका घेण्यात येत असून सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम चालू आहे. या ६८ ग्रामपंचायतची एकूण मतदार संख्या ११०५६२ आहे. मतदारसंख्यानुसार मतदारांना मतदान करण्यासाठी २२५ केंद्राची व्यवस्था करण्यात आली. तालुक्यात सर्वात मोठी नरसी तर सर्वात लहान मेळगाव ग्रामपंचायत मतदारसंघ आहे.
या निवडणुकीत भोपाळा, धुप्पा, खैरगाव, कुंचोली, मुस्तापूर शेळगाव गौरी, टाकळी(बु), मनुर(त.ब) या ग्रामपंचायत मतदार संघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. भोपाळा ग्रामपंचायत मतदारसंघात पुरुष ५०८ व महिला५७१ तर एकूण १०७९ मतदार आहेत. धुप्पा-पुरूष ६४८ व महिला ६९२ तर एकूण १३४०
खैरगाव पुरुष ६८२ महिला ६८५ एकूण १३६७ मतदार आहेत. कुंचोली पुरुष ९०१ व महिला १ हजार तर एकूण १९१० मतदार आहेत. मुस्तापूर पुरुष ३१० व महिला ३१९ एकूण ६२९ मतदार आहेत. शेळगाव गौरी पुरुष ६१६ महिला ६८७ एकूण एकूण १३०३ मतदार आहेत. टाकळी(बु)- पुरुष ६९६ महिला ८०० एकूण १४९५ मतदार आहेत. मनुर(त ब) पुरुष ५४१ महिला ५४७ एकूण १०८८ मतदार आहेत. या ८ ग्रामपंचायत मतदार संघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या ३९१ ने अधिक आहे.