जिल्ह्यात २५ लाख ८१ हजार ५८ मतदार आहेत. यापैकी १ हजार ९५७ मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नसल्याची बाब पुढे आली आहे. अशा मतदारांचा शोध घेण्याचे निर्देश बीएलओंना देण्यात आले आहेत. यातील छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या पत्त्यावर बीएलओ भेट देत असून त्यांची माहिती घेतली जात आहे. ते उपलब्ध नसतील तर कुटुंबीयांकडून छायाचित्र उपलब्ध करून घेतले जात आहेत. कुटुंबीयांचा व मतदारांचा कोणताही ठावठिकाणा नसल्यास मात्र नाव वगळले जात आहे.
येथे जमा करा छायाचित्र
ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाही अशा मतदारांचा निवडणूक विभागाकडून शोध घेतला जात आहे. मतदारांनी आपले छायाचित्र नसल्यास स्थानिक बीएलओ अथवा तहसीलकडे संपर्क साधून आपला फोटो द्यावा. त्यानंतर हा फोटो समाविष्ट केला जाईल.
फॉर्म नं. ८ द्वारे करेक्शन करू शकता
ज्या मतदारांची छायाचित्र उपलब्ध नाहीत अशा मतदारांशी संपर्क साधला जात आहे. बीएलओकडून ही मोहीम राबविली जात आहे. बीएलओ घरी जाऊन पडताळणी करीत आहेत. मतदारांनी आपले छायाचित्र नसल्यास फॉर्म नं. ८ भरून करेक्शन करता येऊ शकते. या सुविधेचा लाभ घ्यावा.
- प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग, नांदेड
नांदेड : जिल्ह्यात ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीत नाहीत अशा मतदारांची नावे वगळण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानंतर जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची पडताळणी केली जात असून, ज्या मतदारांचा कुठलाही ठावठिकाणा लागत नाही, अशा मतदारांची नावे वगळली जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ७६९ नावे वगळण्यात आली आहेत, तर त्याच वेळी ९५ मतदारांची छायाचित्रे घेण्यात आली आहेत.
जिल्ह्यात २५ लाख ८१ हजार ५८ मतदार आहेत. यापैकी १ हजार ९५७ मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नसल्याची बाब पुढे आली आहे. अशा मतदारांचा शोध घेण्याचे निर्देश बीएलओंना देण्यात आले आहेत. यातील छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या पत्त्यावर बीएलओ भेट देत असून त्यांची माहिती घेतली जात आहे. ते उपलब्ध नसतील तर कुटुंबीयांकडून छायाचित्र उपलब्ध करून घेतले जात आहेत. कुटुंबीयांचा व मतदारांचा कोणताही ठावठिकाणा नसल्यास मात्र नाव वगळले जात आहे.
येथे जमा करा छायाचित्र
ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाही अशा मतदारांचा निवडणूक विभागाकडून शोध घेतला जात आहे. मतदारांनी आपले छायाचित्र नसल्यास स्थानिक बीएलओ अथवा तहसीलकडे संपर्क साधून आपला फोटो द्यावा. त्यानंतर हा फोटो समाविष्ट केला जाईल.
फॉर्म नं. ८ द्वारे करेक्शन करू शकता
ज्या मतदारांची छायाचित्रे उपलब्ध नाहीत अशा मतदारांशी संपर्क साधला जात आहे. बीएलओकडून ही मोहीम राबविली जात आहे. बीएलओ घरी जाऊन पडताळणी करीत आहेत. मतदारांनी आपले छायाचित्र नसल्यास फॉर्म नं. ८ भरून करेक्शन करता येऊ शकते. या सुविधेचा लाभ घ्यावा.
- प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग, नांदेड