विविध आघाडीवर ‘आदर्श गाव’ म्हणून परिचित असलेल्या नांदेड तालुक्यातील सोमेश्वर ग्रामपंचायतीची यावर्षीची निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ७ जागांपैकी ५ सदस्य गावकरी मंडळींनी ठरवून बिनविरोध निवडून दिले. दोनच जागांसाठी निवडणूक झाली. त्यातही गावकरी सकारात्मक राहिले. काल मंडल अधिकारी बी. एन. जेलेवाड यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या अधिपत्याखाली सरपंच व उपसरपंचपदाची निवड बिनविरोध पार पडली. त्यांना तलाठी मंगेश वांगीकर व ग्रामसेवक परतवाघ यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आशा सदाशिव कणसे, शोभा मुगाजी बोकारे, तुकाराम कुंडलिक बोकारे, कांता भाऊराव सरोदे, जनार्दन बोकारे,राम बोकारे,नारायण बोकारे, प्रकाश बोकारे,बाबूराव एकनाथ बोकारे,पांडुरंग बोकारे,देवीदास बोकारे,विक्रम बोकारे,राजू बोकारे ज्ञानेश्वर बोकारे हे उपस्थित होते. नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे व डॉ. जयप्रकाश नागला यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच ननिता बोकारे व उपसरपंच बाबूराव बोकारे यांचा सत्कार करण्यात आला.
सोमेश्वरच्या सरपंचपदी नमिता बोकारे तर उपसरपंचपदी बाबूराव बोकारे यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:19 AM