नांदेड- कोरोनाच्या महामारीत मध्यंतरी बंद करण्यात आलेली एअर इंडियाची नांदेड-अमृतसर-दिल्ली विमानसेवा काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती; परंतु आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रवासीसंख्या घटल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे ही विमानसेवा ३० मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गुरुद्वारात येणार्ययेणार्या भाविकांची मात्र गैरसोय होणार आहे. यापूर्वी आठवड्यातून तीन दिवस नांदेड-अमृतसर-दिल्ली ही विमानसेवा चालविण्यात येत हाेती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रवासी संख्या घटल्याने ही सेवा काही दिवसांसाठी बंद करण्यात आली होती. कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर पुन्हा ही सेवा सुरू होती; परंतु आता दुसऱ्या लाटेत प्रवासी संख्या घटल्याने कंपनीचे नुकसान होत आहे. त्यामुळे ३१ मेपर्यंत ही सेवा बंद करण्यात आली आहे. आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी असे दिवस ही विमानसेवा सुरू होती. या विमानसेवेमुळे पंजाब, दिल्ली येथून भाविक नांदेडात गुरूद्वारा दर्शनासाठी येत होते. जून महिन्याची बुकिंग मात्र करण्यात येत आहे. प्रवासी संख्या वाढल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. तर ट्रुजेटची नांदेड-हैद्राबाद-मुंबई ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू आहे.
नांदेड-अमृतसर-दिल्ली विमानसेवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:17 AM