शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

नांदेड-मुंबई विमान पुन्हा झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 1:15 AM

नांदेड : केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत घोषित करण्यात आलेल्या नांदेड-मुंबई आणि नांदेड- हैदराबाद टू-जेट विमानसेवेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. तब्बल चार वर्षांनंतर नांदेड-मुंबई विमानसेवा पूर्ववत झाली आहे. या विमानसेवेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी ५५ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला.आता पुढचे पाऊल म्हणून नांदेड शहराला देशातील इतर महत्वाच्या शहराशी जोडण्यासाठी एअर इंडियाची नांदेड-दिल्ली-अमृृतसर ...

ठळक मुद्देएअर इंडियाची बोर्इंग विमानसेवाही लवकरच - अशोक चव्हाण

नांदेड : केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत घोषित करण्यात आलेल्या नांदेड-मुंबई आणि नांदेड- हैदराबाद टू-जेट विमानसेवेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. तब्बल चार वर्षांनंतर नांदेड-मुंबई विमानसेवा पूर्ववत झाली आहे. या विमानसेवेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी ५५ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला.

आता पुढचे पाऊल म्हणून नांदेड शहराला देशातील इतर महत्वाच्या शहराशी जोडण्यासाठी एअर इंडियाची नांदेड-दिल्ली-अमृृतसर अशी विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असून ही विमानसेवाही लवकरच सुरु होईल, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. एअर इंडिया कंपनीने नांदेड अमृतसर ही विमानसेवा सुरु करण्यासाठीची चाचपणी घेतली आहे. नांदेड अमृतसर हे विमान व्हाया दिल्ली मार्गे सुरु केले तर प्रवाशांची अधिक उपलब्धी होऊ शकते. तसेच देशाची राजधानी दिल्लीला विमानसेवेने जोडता येईल त्या दृष्टीने केंद्र शासनाच्या नागरी उड्डान मंत्रालय व एअर इंडियाच्या प्रशासनाशी चर्चा झाली असल्याचे सांगत एअर इंडिया कंपनीमार्फत याबाबतची चाचपणी करण्यात येत असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.

नांदेड-दिल्ली-अमृतसर या विमानसेवेसोबतच मुंबई-कोल्हापूर, मुंबई-सोलापूर, व मुुंबई -अमरावती अशी विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या संदर्भात येणाºया काळात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता असून नांदेड-दिल्ली-अमृतसर अशी विमानसेवा एअर इंडियाकडून लवकरच सुरु होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एअर इंडिया कंपनीच्या बोईंग विमानाची आसनक्षमता जास्तीची आहे. ११७ किंवा १७० आसन व्यवस्था असलेले विमान या मार्गावर चालविल्या जाणार आहे. त्यामुळे हे विमान उतरण्यास आवश्यक असलेली धावपट्टी व इतर सुविधांचा आढावा कंपनीकडून लवकरच घेण्यात येणार असल्याचे समजते.

अमृतसरमार्गे कनेक्टीव्हीटीसाठी प्रयत्ननांदेड -मुंबई विमानसेवा सुरु झाली. ही बाब गुरुद्वारा येथे दर्शनाला येणाºया भाविकांसाठी दिलासा देणारी असल्याचे सचखंड गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष आ. सरदार तारासिंघ यांनी म्हटले आहे. येणाºया काळात नांदेड-मुंबई विमानसेवेला अमृतसर-मुंबई आणि अमृतसर-हैदराबाद अशी कनेक्टीव्हीटी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असे झाल्यास अमृतसरहून मुंबई मार्गे नांदेड आणि अमृतसरहून हैदराबाद मार्गे नांदेड असा प्रवासही करता येईल. ३० लाख शीख बांधव विविध देशांत राहतात. त्यांच्यासाठी ही विमानसेवा मोलाची ठरणार असल्याचेही तारासिंह यांनी सांगितले.

नांदेडहून सकाळी १०.३५ ला सुटणार विमानमुंबईहून दुपारी १२़४५ वाजता सुटणारे विमान दुपारी २ वाजून २० मिनिटांनी नांदेडमध्ये पोहोचेल़ नांदेडहून सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी सुटणारे विमान मुंबईत दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल़रनवेच्या दुरुस्तीसाठी बंद असलेली नांदेड-हैदराबाद विमानसेवाही १६ नोव्हेंबरपासूनच सुरू झाली.हैदराबाद येथून सकाळी ९ वाजता निघणारे विमान सकाळी १० वाजता नांदेडात तर नांदेडहून दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुटणारे विमान दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी हैदराबाद येथे पोहोचणार आहे.