लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आॅनलाईल सुविधा उपलब्ध नसल्याच्या कारणावरुन नांदेड परिमंडळातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने चालविण्यात येणारी ९८ वीजबिल भरणा केंद्र बंद करण्यात आली आहेत, परंतु महावितरणच्या वतीने इतर ठिकाणी नांदेड परिमंडळात १२५५ वीजबिल भरणा केंद्र उपलब्ध करून दिली आहेत.ग्राहकाभिमुख सेवेसाठी सदैव प्रयत्नरत असलेल्या महावितरणने आपली सर्व वीजबिल भरणा केंद्र आॅनलाईन केली आहेत. त्यामुळे आता वीजग्राहकांना कोणत्याही भरणा केंद्र्रावर जावून वीजबिल भरता येणार आहे. दरमहा वीजबिल भरता येणार आहे. वीजबिल भरल्यानंतर तात्काळ केंद्राकडून वीजबिल भरल्याची पावती दिली जाणार आहे. सदरील केंद्र्रावर वीजबिल भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्मार्ट फोनधारकांनी महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे बिलाचा भरणा करावा. या पर्यायांच्या माध्यमातून ग्राहकांनी वीजबिल नियमित भरावे, असे आवाहन नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांनी केले आहे. नव्याने सुरू केलेली वीजबिल भरणा केंद्र त्वरित सुरू करण्याच्या दृष्टीने नांदेड परिमंडळाचे वित्त व लेखा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक मधुकर सावंतराव, अविनाश डमरे यांनी परिश्रम घेतले.परिमंडळात १२५५ केंद्रांवर सेवा उपलब्धनांदेड परिमंडळातील वीजग्राहकांसाठी १२५५ वीजबिल भरणा केंद्राची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ४६९, परभणी जिल्ह्यातील ५१२ तर हिंगोली जिल्ह्यातील २७४ भरणा केंद्रांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात ४१३ वकरांगी केंद्र, खाजगी पतसंस्थांची ३४ केंद्र त्याचबरोबर महावितरण संचलित २२ वीजबिल भरणा केंद्र, परभणी जिल्ह्यात १६० ग्रामपंचायतींची महाआॅनलाईन केंद्र, २९७ वकरांगी केंद्र, बुलढाणा अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेची १४ खाजगी पतसंस्थांची ११, महावितरण संचलित ३० वीजबिल भरणा केंद्रांचा समावेश आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यात २४६ वकरांगी केंद्र, बुलढाणा अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेची ९, खाजगी पतसंस्थांची ८ आणि महावितरण संचलित ११ वीजबिल भरणा केंद्रांतून वीज ग्राहकांना सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नांदेड परिमंडळातील ९८ वीजबिल केंद्रांना टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:31 AM
आॅनलाईल सुविधा उपलब्ध नसल्याच्या कारणावरुन नांदेड परिमंडळातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने चालविण्यात येणारी ९८ वीजबिल भरणा केंद्र बंद करण्यात आली आहेत, परंतु महावितरणच्या वतीने इतर ठिकाणी नांदेड परिमंडळात १२५५ वीजबिल भरणा केंद्र उपलब्ध करून दिली आहेत.
ठळक मुद्दे महावितरण: आॅनलाईन सुविधा उपलब्ध नसल्याने ओढवली नामुष्की