शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
2
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
3
संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
4
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
5
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
6
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
7
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
8
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
9
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
10
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
13
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी
14
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
15
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
16
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
17
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
18
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
19
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
20
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."

नांदेड भाजपत शह काटशहाचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:56 AM

सर्व प्रमुख पक्ष विधानसभा, लोकसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी करीत असताना भाजपात मात्र अंतर्गत शह काटशहाचे राजकारण सुरु आहे. भाजपाच्या उत्तर ग्रामीण तालुकाध्यक्ष दीपक पावडे यांच्या फेरनियुक्तीनंतर भाजपात उघडउघड दोन गट पडल्याचे चित्र असून जिल्हास्तरावरील नेत्यांत सुरु असलेल्या या अंतर्गत राजकारणामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यातून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सर्व प्रमुख पक्ष विधानसभा, लोकसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी करीत असताना भाजपात मात्र अंतर्गत शह काटशहाचे राजकारण सुरु आहे. भाजपाच्या उत्तर ग्रामीण तालुकाध्यक्ष दीपक पावडे यांच्या फेरनियुक्तीनंतर भाजपात उघडउघड दोन गट पडल्याचे चित्र असून जिल्हास्तरावरील नेत्यांत सुरु असलेल्या या अंतर्गत राजकारणामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यातून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.नांदेड उत्तर ग्रामीणचे तालुकाध्यक्ष दीपक पावडे यांची महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांनी अकार्यक्षम ठरवत पदावरुन हकालपट्टी केली होती. या हकालपट्टीनंतर माजी खासदार भास्करराव खतगावकर गटाने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे धाव घेतली. इतकेच नव्हे तर पावडे यांच्या हकालपट्टीस स्थगितीही मिळविली. त्यामुळे शहर जिल्हाध्यक्षांच्या निर्णयाला पक्षात काही स्थान आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला. परिणामी हा विषय प्रतिष्ठेचा बनवत शहर जिल्हाध्यक्ष डॉ. हंबर्डे हेही गुरुवारी प्रदेशाध्यक्ष दानवे यांची त्यांनी भेट घेतली.यावेळी पावडे यांच्यावरील कारवाई पक्षशिस्तीला धरुनच होती. त्यामुळे या कारवाईला दिलेली स्थगिती मागे घेण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. धनाजीराव देशमुख, रामराव केंद्रे, विजय गंभीरे, दिलीपसिंह ठाकूर, मिलिंद देशमुख, बंडू पावडे, राजेंद्रसिंह पुजारी,सुरेंद्र घोडजकर, मोतीराम पाटील मोरे, विनायक कदम, विनायक सगर, व्यंकट मोकले, गणेश घोरपडे आदींची उपस्थिती होती.तर दुसरीकडे गुरुवारी शहरातील राजेंद्रनगरात पावडे यांच्या फेरनियुक्तीचा खतगावकर गटाने जल्लोष केला. यावेळी माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, चैतन्य देशमुख, विनोद पावडे, संतोष वर्मा, जनार्दन ठाकूर आदींची उपस्थिती होती. एकीकडे जल्लोष होत असताना दुसरीकडे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आपला निर्णय योग्य कसा होता हे प्रदेशाध्यक्षांना सांगत होते हे विशेष.गटबाजीमुळे मनपा ा निवडणुकीत भाजपाला मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यापासून धडा न घेता पक्षातील गटबाजी कमी न होता उघडपणे पुढे येत आहे. महापालिका विरोधी पक्षनेतेपदावरील नियुक्तीचा विषयही गटबाजीमुळेच रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी सूचना देवूनही मनपात कोणतीही हालचाल झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेशित करुनही पक्षाच्या एकाही नेत्याने या प्रकरणात लक्ष घातले नाही. आगामी काळातील निवडणुका पाहता भाजपातील गटबाजीला आणखी उधाण येणार हे निश्चित आहे.भाजप शिस्तीचा पक्ष आहे. पक्षशिस्तीविरुद्ध काम करणाऱ्यावर कारवाई केली जाईल असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केल्याचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष ठरवेल तोच निर्णय पक्षात अंतिम राहतो. पावडेबाबत लवकरच निर्णय होईल, असेही हंबर्डे म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडBJPभाजपाraosaheb danveरावसाहेब दानवे