शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

नांदेडमध्ये वाहतूक शाखेचा भार होमगार्डच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 4:47 PM

मागील काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांचे काम होमगार्ड करीत असल्याचे चित्र आहे़ 

ठळक मुद्देवाहतूक समस्येचा तिढा सुटेना व्हीआयपी रस्त्यावर होताहेत रोजच वाद

नांदेड : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेला यश मिळत नाही़ शहर वाहतूक शाखेचे दोन तुकडे केल्यानंतर तर वाहतूक कोंडीत वाढ झाल्याचेच पहायला मिळत आहे़ दरम्यान, मागील काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांचे काम होमगार्ड करीत असल्याचे चित्र आहे़ 

नांदेड शहरातील वाहतूक कोंडी सर्वसामान्य नांदेडकरांसह बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांचीही डोकदुखी ठरत आहे़ नांदेड शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आजपर्यंत वेगवेगळे उपाय करण्यात आले़ परंतु, आजपर्यंत यश मिळालेले नाही़ दरम्यान, काही दिवसांपासून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी बुलेटस्वारांसह नियम तोडणाऱ्या जवळपास दीड हजारांवर दुचाकीस्वारांसह आॅटोचालकांवर कारवाई केली होती़ सदर मोहिमेमुळे भाग्यनगर हद्दीतील शिकवणी परिसरात टार्गट मुलांमध्ये भीती निर्माण झाली होती़ परंतु, सदर कारवाईदेखील थंड झाल्याने पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे़ 

दोन दिवसांपासून दररोज व्हीआयपी रस्त्यावरील बेकरीसमोर वाहनचालकांचे वाद होत आहेत़ अनेक हॉटेल आणि बेकरी चालकांकडे स्वत:ची पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यावरच उभी केली जातात़ परिणामी ये-जा करणाऱ्या वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागतो़ यातूनच एखाद्या वाहनाला धक्का लागून वाद उद्भवण्याच्या घटना वारंवार घडत आहेत़ दोन दिवसांपासून सलग रात्रीच्या वेळी वाहनधारक आणि पार्किंग केलेल्या वाहनधारकांमधील वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याचे पहायला मिळाले़ शहरातील तरोडा नाका, राज कॉर्नर, वर्कशॉप, आयटीआय, कलामंदिरपासून पुढे जुना मोंढा, देगलूरनाका, बर्की चौक आदी मुख्य चौकांमध्ये दररोजच वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे़ तर मुख्य चौकात अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांऐवजी केवळ होमगार्ड उभे असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ त्यामुळे नियमबाह्य वाहने चालविणाऱ्यांवर कुणाचाही अंकुश राहिला नसल्याचे बोलले जात आहे़ शहरातील वाहतुकीस शिस्त लावण्याच्या उद्देशाने शहर  वाहतुकीचे विभाजन करण्यात आले़ परंतु, त्याचा म्हणावा तसा परिणाम झाल्याचे चित्र दिसत नाही़ उलट पूर्वी चार ते पाच कर्मचाऱ्यांवर असणारे कार्यालयीन काम आता दोन विभागामुळे दहा ते बारा कर्मचारी कार्यालयात अडकून पडत आहेत़ तर पोलीस निरीक्षक अथवा पोलीस उपनिरीक्षक रस्त्यावर उतरल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत नाही़

मनपा पोलिसांचा सामूहिक पुढाकार गरजेचाशहरातील कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेसंदर्भात शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांना विचारले असता त्यांनी आपण माळेगावात असल्याचे सांगितले़ दरम्यान, दुसरे पोलीस निरीक्षक चौधरी यांच्याशी संपर्क होवू शकला नाही़ ४बेशिस्त आॅटोचालक, नियमबाह्य पार्किंग व वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे़ वाहतूक कोंडीतून नांदेडकरांना सुटका मिळविण्यासाठी मनपा आणि वाहतूक शाखेने सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे़ 

टॅग्स :Nandedनांदेडtraffic policeवाहतूक पोलीसNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाTrafficवाहतूक कोंडी