शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

नांदेडची शहर बससेवा झाली तोळामोळा; अवघ्या नऊ गाड्यांवर मदार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 12:03 PM

जवळपास सहा लाख लोकसंख्या असणार्‍या नांदेड शहर व परिसरातील नगरांना आजघडीला ८ ते १० बसच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे़ एसटीतील अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे दिवसेंदिवस शहर बस तोट्यात धावत आहे.

ठळक मुद्देएसटीतील अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे दिवसेंदिवस शहर बस तोट्यात धावत आहे. संचित तोटा पोहोचला १९ कोटीच्या घरात नांदेड शहर व परिसरातील नगरांना आजघडीला ८ ते १० बसच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे़

नांदेड : जवळपास सहा लाख लोकसंख्या असणार्‍या नांदेड शहर व परिसरातील नगरांना आजघडीला ८ ते १० बसच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे़ एसटीतील अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे दिवसेंदिवस शहर बस तोट्यात धावत आहे. महापालिकेने हस्तांतरित केल्यापासून आजपर्यंत १९ कोटी ३५ लाख ९५ हजारांचा संचित तोटा राज्य परिवहन महामंडळाच्या माथी पडला आहे.

महापालिकेने २०१० मध्ये शहर बस चालविण्याची जबाबदारी एसटी महामंडळाकडे दिली होती़ यानंतर जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानाअंतर्गत मिळालेल्या ३० बस महामंडळाला देण्यात आल्या़ यामध्ये दहा मोठ्या आणि २० मिनी बसचा समावेश होता़ परंतु, टाटा कंपनीच्या असलेल्या या बससेवेच्या देखभाल-दुरुस्तीचा मेळ एसटीच्या कर्मचार्‍यांना लागलाच नाही़ दुरूस्तीचा खर्च आवाक्याबाहेर गेल्यामुळे पहिल्या वर्षातच या सेवेचे तीन तेरा वाजणार असल्याचे स्पष्ट झाले होते़ यानंतरही रडत-पडत एसटीतील अधिकार्‍यांनी सदर सेवा रेटून नेण्याचा प्रयत्न केला़ आजघडीला केवळ औपचारिकता म्हणून शहर बससेवा दिली जात आहे़ ३० पैकी ८ ते १० बसेस रस्त्यावर असतात़ गुरूवारी केवळ ९ बस  शहरात धावत असताना आढळून आल्या़ शहराला बोटावर मोजण्याऐवढ्या बस सेवा देत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़

जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत नांदेडात शहर बस सेवेसाठी लालपरी मिळाली होती़ ही सेवा चालविण्याची जबाबदारी मनपाने कंत्राटदाराकडे दिली होती़ कंत्राटदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे शहरबससेवा बंद पडली़ त्यानंतर हे काम अकोल्याच्या एका खासगी कंपनीला दिले़ 

अकोल्याच्या कंपनीला तर लालपरी भंगारात काढण्याची वेळ आली़ यानंतर शहरबसेवेचा प्रश्न गंभीर झाला होता़ त्यानंतर मिळालेल्या ३० बस महापालिकेने एसटी महामंडळाला चालविण्यासाठी दिल्या़ परंतु अगोदरच कर्मचार्‍यांची अपुरी संख्या असलेल्या महामंडळाने उसने अवसान आणून ही जबाबदारी स्वीकारली़ परंतु पहिल्या काही महिन्यातच या बसेसच्या दुरुस्तीसाठी लागणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्यामुळे एक-एक बस दुरुस्तीच्या नावाखाली वर्कशॉपला जमा होण्यास सुरुवात झाली़ सदर बससेवा तोट्यात जात असल्याचे निदर्शनास आल्याने बससेवा पुन्हा महापालिकेने चालवावी, असा पत्रव्यवहार एसटीने महापालिकेशी करण्यास सुरूवात केली़ परंतु, आजपर्यंत महापालिका प्रशासनाने कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही़ 

नियोजनाचा अभाव शहरातून गजानन महाराज मंदिर ते रेल्वेस्थानक, रेल्वेस्थानक ते विद्यापीठ, विद्यापीठ ते सांगवी, विष्णुपुरी, भनगी ते रेल्वेस्थानक आदी मार्गावर गर्दी असते़ परंतु, या मार्गावर केवळ एक बस असल्याने प्रवाशांना  नाईलाजाने आॅटोने  प्रवास करावा लागतो़ रेल्वेस्टेशन ते सिडको, हडको, विद्यापीठ या मार्गावर विद्यार्थी संख्या अधिक असते़ परंतु या मार्गावरही एखादी बस सोडली जाते़ मध्यंतरी मनपाने नव्याने शहर बससेवेच्या हालचाली सुरु केल्या होत्या़ त्यात महापालिका निवडणूक आल्याने त्या चर्चेला विराम मिळाला होता़   

टॅग्स :NandedनांदेडMuncipal Corporationनगर पालिकाstate transportएसटी