शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

नांदेडात सत्ताधाऱ्यांचा विकासाचा दावा, तर विरोधक वर्षभरात असमाधानीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 1:02 AM

महापालिकेच्या वर्षभराच्या कार्यकाळात कचरा प्रश्न, महापुरुषांंचे पुतळे, हैदराबाग येथील रुग्णालय, मालमत्ताकराच्या थकबाकीवरील शास्ती माफी, अमृत पाणीपुरवठा योजना आदी मोठी कामे पूर्ण झाल्याचा दावा सत्ताधाºयांनी केला आहे तर शहरात नवीन रस्ते, विकासकामे करणे सोडाच पण सत्ताधाºयांनी शहरातील खड्डे बुजविले असते तरीही पुरे होते अशी बोचरी टीका विरोधकांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिकेच्या वर्षभराच्या कार्यकाळात कचरा प्रश्न, महापुरुषांंचे पुतळे, हैदराबाग येथील रुग्णालय, मालमत्ताकराच्या थकबाकीवरील शास्ती माफी, अमृत पाणीपुरवठा योजना आदी मोठी कामे पूर्ण झाल्याचा दावा सत्ताधाºयांनी केला आहे तर शहरात नवीन रस्ते, विकासकामे करणे सोडाच पण सत्ताधाºयांनी शहरातील खड्डे बुजविले असते तरीही पुरे होते अशी बोचरी टीका विरोधकांनी केली आहे.महापालिकेच्या विद्यमान सदस्यांचा १२ आॅक्टोबर रोजी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या वर्षभराच्या कार्यकाळात शहरात झालेल्या आणि न झालेल्या कामांचा आढावा ‘लोकमत’ ने गुरुवारी घेतला. यात मनपा पदाधिकाºयांनी वर्षभरात जनहिताचे मोठे निर्णय झाल्याचे सांगितले. त्यात कचरा प्रश्न मार्गी लावणे, महापुरुषांचे पुतळे, चौक सुशोभिकरण आणि दलितवस्ती निधीचा प्रश्न मार्गी लावल्याचे सांगितले.हैदरबागमध्ये सुसज्ज रुग्णालयमहापौर शीलाताई भवरे यांनी सांगितले, शहरात कचºयाचा प्रश्न प्रारंभीच मार्गी लावला. तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत गरजूंना एक हजार घरे देण्यात आली. ९०० घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जेएनएनएनयुआरएम योजनेअंतर्गत टप्पा एक व दोन मधील कामे पूर्णत्वाकडे नेली जात आहेत. शहरात हरित नांदेड योजनेअंतर्गत वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. अमृत योजनेअंतर्गत ४० कोटींची भूमिगत ड्रेनेज लाईन प्रस्तावही केली जात आहे. जुन्या नांदेडातील हैदरबाग येथे सर्वसोयीयुक्त मनपा रुग्णालय सुरु केले असून येथे प्रसूतीसह सिझेरिंगची व्यवस्था आहे.प्रमुख रस्त्यांची कामे मार्गीउपमहापौर विनय गिरडे यांनीही शहरात अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु असल्याचे सांगितले. शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत. सिडकोतील प्रलंबित रस्तेही मार्गी लागले असल्याचे गिरडे यांनी स्पष्ट केले. बीओटी तत्वावर महात्मा फुले मंगल कार्यालय आणि तरोडेकर भाजी मार्केट येथे भव्य संकुल उभारले जाणार आहे. अग्निशमन विभागाच्या इमारत बांधकामासाठी मंजुरी मिळाली असून ८० लाखांची निविदा काढण्यात आली आहे.

आकृतीबंध मंजुरीच्या अंतिम टप्प्यातस्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांनी सांगितले, नांदेड महापालिकेला औरंगाबाद महापालिकेप्रमाणे शासनाकडून अनुदान मिळत नाही. अनुदानाबाबत भेदभाव केला जात आहे. असे असतानाही नांदेड महापालिकेने वर्षभरात महत्वाची विकासकामे केली आहेत. त्यामध्ये स्टेडीयम आधुनिकीकरणासाठी ४२ कोटी, कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी २७ कोटी निधी प्राप्त केला आहे. कर्मचाºयांच्या आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमही अंतिम केले जात आहेत. अनधिकृत नळधारकांसाठी विशेष सभा घेत आपण अभय योजना आणली. त्यामध्ये नळजोडणी अधिकृत केली जात आहे. शहरातील शॉपींग कॉम्प्लेक्सचे कामही पूर्ण केले जात आहे.

कचरा प्रक्रिया प्रकल्पही मंजूरसभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनीही शहरावासियांसाठी वर्षभर डोकेदुखी ठरलेला कचरा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर कचरा प्रक्रिया प्रकल्पही मंजूर झाल्याचे सांगितले. महापालिकेने स्वत:च्या निधीतून श्री गुरुगोविंदसिंघजी मैदान आंतरराष्टÑीय दर्जाच्या क्रिकेट सामन्यासाठी तयार केले आहे. आगामी काळात महापालिकेच्या वतीने शहरातील मान्यवर व्यक्तींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणा आहे. त्याचवेळी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनास तीन वर्षानंतर ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्याची तयारी महापालिका आतापासूनच करत आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाची प्रेरणा देणारा स्मृतिस्तंभ असलेल्या माता गुजरीजी उद्यानाचा विकास केला जाणार आहे. यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे गाडीवाले म्हणाले.गोदावरीचे पावित्र्य राखण्यात अपयशीविरोधी पक्ष नेत्या गुरुप्रितकौर सोडी यांनी शहरात मूलभूत सुविधाही पुरविण्यात महापालिका अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. गोदावरी शुद्धीकरणाचा गवगवा केला जात असला तरी शहरातील अनेक नाले थेट गोदावरी नदीतच सोडले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीचे पावित्र्य राखण्यात महापालिका अपयशी ठरली आहे.शहरातील अनेक भागांत ड्रेनेज चेंबर उघडे आहेत. त्यात पडून बालकांचा मृत्यू झाला आहे. शहरात कचरा प्रश्नही कायम असून अबचलनगरसह अनेक भागांत आठ-आठ दिवस कचºयाच्या गाड्या जात नाहीत. तसेच ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा न नेता एकत्रच नेला जात असल्याचे सोडी म्हणाल्या. 

खड्डे बुजविले असले तरी आनंदमाजी विरोधी पक्ष नेते तथा नगरसेवक दीपकसिंह रावत यांनी वर्षभरात सत्ताधाºयांनी विकासकामे, नवीन रस्ते करणे सोडाच शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविले असते तरी शहरवासियांना आनंद झाला असता. महापालिकेचे विद्यमान पदाधिकारी, नगरसेवक शहरवासियांच्या समस्या सोडविण्याऐवजी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याची टीकाही त्यांनी केली. बीओटी सारखे प्रकल्प महापालिकेच्या हिताचे नसतानाही ते सत्तेच्या बळावर मंजूर केले जात आहेत. यात सामान्यांचा कोणताही लाभ नसून ठेकेदारांच्या तुंबड्या भरल्या जात असल्याचे रावत म्हणाले.

पथदिवेही बसविले नाहीतमहापालिकेत निवडून आल्यानंतर अनेक प्रभागातील नगरसेवकांना आपल्या भागात पथदिवेही बसविणे शक्य झाले नाही. शहरातील कचरा उचलण्यासाठी दरमहा एक कोटी रुपयाहून अधिक खर्च केला जात आहे. पण प्रत्यक्षात शहरातील पूर्ण कचरा उचलला जात नाही हे वास्तव आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे शहरवासियांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे नगसेवक बालाजी कल्याणकर यांनी सांगितले.एकूणच शहरवासियांच्या अपेक्षांचे मोठे ओझे सत्ताधा-यांवर आहे़ पण आर्थिक कचाट्यात सापडलेल्या महापालिकेला हे ओझे पेलवले जात नसल्याचेच स्पष्ट होत अहे़ यातून सत्ताधा-यांना मार्ग काढावाच लागणार आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाPoliticsराजकारण