नांदेड : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एमबीबीएस व बीडीएस या वैद्यकीय पदवीच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट या प्रवेशपूर्व परिक्षेत नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा आला असून राज्यात अव्वल ठरला आहे. इयत्ता ५ वी पासून नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या कष्टामुळेच हे यश मिळाल्याची प्रतिक्रया कृष्णाचे वडील डॉ. आशिष अग्रवाल यांनी व्यक्त केली.
नीटसाठी देशभरातून १३ लाख २६ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती़ यात ७२० पैकी ६८५ गुण मिळवत नांदेडच्या कृष्णा अग्रवालने घवघवीत यश मिळविले़ कृष्णाचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत़ वडील बालरोग तज्ज्ञ तर आई दंतरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे़ त्याचे इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण नांदेड येथीच ज्ञानमाता विद्यालयात तर ११, १२ वी चे वेदांत महाविद्यालयात झाले़ ५ वी पासूनच त्याचा नियोजनबद्ध अभ्यास घेतला़ त्यामुळे हे यश अपेक्षितच होते़ महाराष्ट्रात अव्वल तर देशात पहिल्या १० विद्यार्थ्यांमध्ये तो असेल असा विश्वास होता. आज जाहिर झालेल्या निकालाने हा विश्वास सार्थकी लागल्याचे सांगत या यशाचे श्रेय त्यांनी नांदेड येथील त्याच्या शिक्षकांना दिले.
नांदेडची टिम चांगली आहे़ त्यामुळे कृष्णाचे बेसिक फाऊंडेशन मजबुत झाले़ गणेश चौगुले, भार्गव राजे, रमाकांत जोशी, व्ही़डीक़ोनाळे, एक़े़सिंग आदी शिक्षकांकडे आम्ही कृष्णाला सोपविले होते़ निकालात या शिक्षकांचा सिहांचा वाटा असल्याचे सांगत नीटसाठीचा अभ्यास करताना आम्ही आमचे डोके लावले नाही़ तर त्याचे शिक्षक सांगतिल तेवढा आणि तसा अभ्यास कृष्णाकडून करुन घेतल्याचेही डॉ.आशिष अग्रवाल यांनी नमुद केले़
एम्समध्ये प्रवेशासाठी उत्सुकनीट परिक्षेत देशात सातवा आणि महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला कृष्णा अग्रवाल एम्स वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहे़एम्सचा निकाल १८ तारखेला लागणार आहे़ एम्समध्ये प्रवेश मिळेलच अन्यथा मौलाना आझादचा पर्याय असल्याचे कृष्णा अग्रवाल याने सांगितले़ दरम्यान, वैद्यकीय अभ्यासक्रमाची ४ वर्ष आहेत़ या ४ वर्षात पुढे काय करायचे याचा निर्णय कृष्णाच घेईल असे त्याचे वडील डॉ़आशिष अग्रवाल यांनी सांगितले़.