नांदेड : महापालिका स्थायी समिती सभापतीची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.महापालिका स्थायी समिती सभापती शमीम अब्दुला यांचा कार्यकाळ १ डिसेंबर रोजी संपला. हा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम घोषित करण्याबाबत महापालिकेने विभागीय आयुक्तांना कळविले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मनपाच्या सभापती निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. ही निवडणूक प्रक्रिया १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू होणार आहे. या निवडणुकीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.स्थायी समितीतील दिग्गज सदस्य चिठ्ठीद्वारे निवृत्त झाल्यानंतर सभापती पदाची स्पर्धा थोडी कमी झाली आहे. एक वर्षाचा कार्यकाळ चिठ्ठीद्वारे माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, उमेश पवळे, सय्यद शेरअली, सतीश देशमुख, प्रशांत तिडके, कांताबाई मुथा आणि ज्योत्सना गोडबोले हे आठ सदस्य निवृत्त झाले. त्यामध्ये तीन पदाधिकाºयांचा समावेश होता तर नव्या निवडीत काँग्रेसने ज्योती कल्याणकर, करुणा कोकाटे, दयानंद वाघमारे, राजेश यन्नम, पुजा पवळे, अ. रशिद, फारुख हुसेन आणि श्रीनिवास जाधव यांना संधी दिली आहे. नव्याने निवडण्यात आलेल्या आठ सदस्यांमध्ये बहुतांश सदस्य नव्यानेच निवडून आले आहेत. त्यामुळे सभापती पदासाठी संधी मिळण्याची शक्यता नाही.स्थायी समिती सभापती शमीम अब्दुला यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता स्थायी समिती सभापती पदाची दावेदार म्हणून मसूद खान आणि फारुख अली यांची नावे पुढे आली आहेत. त्याचवेळी काही बदल झाल्यास मोहीनी येवनकर किंवा भानुसिंह रावत यांनाही संधी दिली जाऊ शकते. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता स्थायी समिती सभापतीपदी पुन्हा मुस्लिम समाजाला संधी दिली जावू शकेल, अशी शक्यता आहे.सभापती पदाचा अंतिम निर्णय काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचाच राहणार आहे. त्यामुळे या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी आप-आपल्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता खा. चव्हाण स्थायी समिती सभापती पदाची संधी कोणाला देतील? याकडे लक्ष लागले आहे.दिग्गज झाले सभापती पदाच्या स्पर्धेतून बादमहापालिका स्थायी समिती सदस्यपदी पहिल्याच टप्प्यात माजी महापौर अब्दुल सत्तार यांच्यासह माजी उपमहापौर आनंद चव्हाण, उमेश पवळे, शमीम अब्दुल्ला तसेच माजी स्थायी समिती सभापती मसूद अहेमद खान या दिग्गजांची नियुक्ती करण्यात आली होती. या दिग्गजांना मागे सारत शमीम अब्दुल्ला यांना सभापतीपदी संधी मिळाली होती. वर्षभराच्या कार्यकाळानंतर सभापती पदाचे इच्छुक माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, उमेश पवळे हे चिठ्ठीद्वारे निवृत्त झाले. त्यामुळे सभापती पदाच्या स्पर्धेतून ते बाद झाले.
नांदेड मनपा सभापती पदाची निवडणूक घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:03 AM
महापालिका स्थायी समिती सभापतीची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.
ठळक मुद्दे१८ डिसेंबर रोजी होणार निवड प्रक्रिया