नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल ९०.३९ टक्के लागला आहे. मुले आणि मुलींच्या उत्तीर्णतेची तुलना केली तर मुलींनी उत्तीर्णतेत आघाडी घेतली आहे. लातूर विभागात जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षा मंडळाने २ जून रोजी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. जिल्ह्यातील ४४ हजार ९४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४४ हजार १०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत ३९ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याचे प्रमाणे ९०.३९ टक्के एवढे आहे.
२३ हजार २६७ मुलांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २०४५२ मुले उत्तीर्ण झाले. तर २० हजार ८४२ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १९ हजार ४२१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.९० टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाणे ९३.१८ टक्के एवढे आहे. लातूर विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्ह्याचा निकाल तळाला आहे. ९४.८८ टक्के निकालासह लातूर जिल्हा आघाडीवर असून, दुसऱ्या क्रमांकावर उस्मानाबाद (९३.५० टक्के) आणि नांदेड जिल्ह्याचा ९०.३९ टक्के निकाल लागला.