शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

नांदेड जिल्ह्यात दहावीतही पुन्हा मुलीच ठरल्या सरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 1:00 AM

जिल्ह्याचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८३.०३ टक्के लागला असून सर्वाधिक निकाल मुखेड तालुक्याचा ९३.८३ टक्के तर सर्वात कमी मुदखेड तालुक्याचा ६९.६७ टक्के इतका लागला आहे. यावर्षीच्या निकालातही मुलीच पुढे आहेत. उत्तीर्णांमध्ये मुलांचे प्रमाण ८०.०७ टक्के तर मुलींचे प्रमाण ८४.०१ टक्के इतके आहे. मागील वर्षीच्या निकालाची तुलना करता यंदाही जवळपास तेवढाच निकाल लागला आहे.

ठळक मुद्देमुखेड तालुक्याचा सर्वाधिक निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्याचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८३.०३ टक्के लागला असून सर्वाधिक निकाल मुखेड तालुक्याचा ९३.८३ टक्के तर सर्वात कमी मुदखेड तालुक्याचा ६९.६७ टक्के इतका लागला आहे. यावर्षीच्या निकालातही मुलीच पुढे आहेत. उत्तीर्णांमध्ये मुलांचे प्रमाण ८०.०७ टक्के तर मुलींचे प्रमाण ८४.०१ टक्के इतके आहे. मागील वर्षीच्या निकालाची तुलना करता यंदाही जवळपास तेवढाच निकाल लागला आहे.तालुकानिहाय निकाल पाहता मुखेड तालुक्याचा सर्वाधिक ९२.२ टक्के इतका निकाल लागला आहे. नांदेड ८२.६३, अर्धापूर ७८.२५, भोकर ७६.९६, बिलोली ८८.२७, देगलूर ८५.९२, धर्माबाद ७७.९२, हदगाव ७३.४७, हिमायतनगर ७४.०१, कंधार ९१.२३, किनवट ८२.१२, लोहा ८३.२६, माहूर ८१.२८, नायगाव ८७.७३, उमरी ७७.०३ तर मुदखेड तालुक्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ६९.६७ टक्के लागला आहे.परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यातील ६६० शाळांतील ४६ हजार १६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २४ हजार ४२९ मुले आणि २१ हजार ३२२ मुली अशा ४५ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३७ हजार ९८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.उत्तीर्ण झालेल्यांमध्ये १९ हजार ५६० मुले तर १८ हजार ४२६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ४१७ विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर १३ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळविले आहे. दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची संख्या ११ हजार ९९६ इतकी आहे.मार्चमध्ये झालेल्या या परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यातील ३ हजार ३२८ पुनर्परीक्षार्थिंंनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ३ हजार २८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १ हजार ३५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थिंच्या यशाचे प्रमाण ४१.२९ टक्के एवढे आहे. यात ३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश मिळविले असून २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ६४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षेचा तालुकानिहाय निकाल पाहता नांदेड ३१.७८, अर्धापूर ३९.८३, भोकर २४, बिलोली ४२.३१, देगलूर ६०, धर्माबाद १३.२७, हदगाव २१.६०, हिमायतनगर १९.७२, कंधार ७३.०९, किनवट २९.९२, लोहा ४४.६०, माहूर ३९.७४, मुखेड ६३.८६, मुदखेड २४.४३, नायगाव ६७.६९ तर उमरी तालुक्यातील पुनर्परीक्षेचा निकाल ११.८६ टक्के इतका लागला आहे. पुनर्परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ९६२ मुले तर ३९६ मुलींचा समावेश आहे.---लातूर विभागात नांदेड तिसºया स्थानावरइयत्ता दहावीचा लातूर विभागाचा निकाल ८६.३० टक्के इतका लागला असून यावेळी नांदेड जिल्हा निकालात तिसºया स्थानावर गेला आहे. विभागात लातूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक चांगला म्हणजेच ९०.२० टक्के एवढा लागला आहे. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८५.६६ टक्के इतका लागला असून नांदेड जिल्ह्याचा निकाल ८३.०३ टक्के तर मागील वर्षी निकाल ८३.०६ टक्के इतका होता.---८६.४२ टक्के मुली, ८०.०७ टक्के मुले उत्तीर्णदहावी परीक्षेच्या निकालाची आकडेवारी पाहता मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.४२ टक्के तर मुलांचे प्रमाण ८०.०७ टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ६.३५ टक्के एवढे अधिक आहे. तालुकानिहाय मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी पाहता नांदेड ८५.२५, अर्धापूर ८५.२२, भोकर ७९.१७, बिलोली ९१.५०, देगलूर ८८.६७, धर्माबाद ८१.४३, हदगाव ७७.४५, हिमायतनगर ८१.१२, कंधार ९५ टक्के, किनवट ८५.२६ टक्के, लोहा ८७.६२, माहूर ८७.१६, मुखेड ९६.०५, मुदखेड ७६.७२, नायगाव ९१.५२ तर उमरीतील मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८४.०१ टक्के इतके आहे.

टॅग्स :NandedनांदेडSSC Results 2018दहावी निकाल २०१८