लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कठुआ, उन्नाव यासह शेजारील परभणी जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील पाशवी बलात्काराच्या घटनांनी सर्वसामान्यांना हादरवून सोडले असताना नांदेड जिल्हाही कोवळ्या कळ्यांसाठी असुरक्षितच असल्याचे गेल्या पंधरा महिन्यांतील आकडेवारीवरुन स्पष्ट होते़ २०१७ या वर्षात जिल्ह्यात ६५ अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्या होत्या़ तर यावर्षी गेल्या तीन महिन्यांतच २६ कोवळ्या कळ्यांना खुडण्यात आले आहे़ दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांत होणारी वाढ चिंताजनक आहे़कठुआ आणि उन्नाव येथील घटनेने देश हादरला आहे़ देशभर या कृत्याच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात येत आहेत़ या घटनांनी कोवळ्या कळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़ याबाबत केंद्र शासनाने बलात्काराच्या कायद्यात सुधारणा केली़ परंतु त्यामुळे खरोखरच अशा घटनांवर आळा घालणे शक्य होईल का? याबाबत सर्वांच्याच मनात सांशकता आहे़ त्यात दिवसेंदिवस अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढच होत आहे़यातील मोजक्याच घटनांची पोलिसांत नोंद होते़ अनेक पीडितांना पोलीस ठाण्यापर्यंत जावूच दिले जात नाही़ जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत २६ अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटना घडल्या़ तीन दिवसाला एक बलात्कार असे चिंतानजक हे प्रमाण आहे़ २०१७ मध्ये वर्षभरात महिलांवरील बलात्काराच्या ८५ घटना घडल्या आहेत़ छेडछाड आणि विनयभंगांच्या १७७ तक्रारीच ठाण्यापर्यंत पोहोचल्या़ प्रत्यक्षात याची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे़ अल्पवयीन मुली व महिलांना लग्नाचे किंवा इतर आमिष दाखवून पळवून नेल्याचे ८६ प्रकार उघडकीस आले आहेत़तर पुरुषी अत्याचाराला बळी पडलेल्या १७ महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे़ जिल्ह्यात अशाप्रकारे महिलांवरील अत्याचारात दरवर्षी वाढ होताना दिसत आहे़ महिलांसाठी कठोर कायदे करण्यात आले़ परंतु प्रत्यक्षात पीडितांना ठाण्यापर्यंतच पोहोचू दिले जात नाही़ त्या ठाण्यापर्यंत पोहोचल्या गुन्हा नोंदविला तरी, त्यानंतर दबावतंत्रांचा वापर करण्यात येतो़त्यामुळे अनेक पीडितांना न्याय मिळतच नाही़ माहूर, किनवट यासारख्या आदिवासी भागात तर अल्पवयीन मुली, महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे़ परंतु अशिक्षितपणामुळे अनेक प्रकरणे प्रतिष्ठितांच्या मध्यस्थीने तिथेच संपविली जातात़ त्यामुळे पीडितांना न्याय मिळत नाही़२५१ महिलांनी केला आत्महत्येचा प्रयत्नसासरच्या मंडळीकडून लग्नानंतर होणाऱ्या हुंड्याच्या पैशाची मागणी पूर्ण न करु शकल्याने ११ महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे़ तर २९४ महिलांनी या विरोधात बंड पुकारत सासरच्या मंडळींना ठाण्याच्या पायरी चढायला भाग पाडले़ यामध्ये १३ महिलांवर त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांकडून प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत़ तर २५१ महिलांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला आहे़ महिला अत्याचारांची गेल्या वर्षभरातील ही आकडेवारी चिंताजनक असून याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज आहे़ महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस दलाकडून अनेक पथकांची स्थापना करण्यात आली आहे़
नांदेड जिल्हाही कोवळ्या कळ्या असुरक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:25 AM
नांदेड जिल्हाही कोवळ्या कळ्यांसाठी असुरक्षितच असल्याचे गेल्या पंधरा महिन्यांतील आकडेवारीवरुन स्पष्ट होते़ २०१७ या वर्षात जिल्ह्यात ६५ अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्या होत्या़ तर यावर्षी गेल्या तीन महिन्यांतच २६ कोवळ्या कळ्यांना खुडण्यात आले आहे़
ठळक मुद्दे९१ अल्पवयीन मुलींवर बलात्कार : हुंड्याच्या पैशासाठी ११ महिलांना गमवावा लागला जीव