लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती दिनानिमित्त त्यांना अलोट जनसागराने मिरवणुका, प्रभात फेऱ्या तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करून अभिवादन केले. नांदेडसह जिल्ह्यात महामानवाच्या जयंतीचा जल्लोष पहायला मिळाला़शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पहाटेपासून अनुयायांनी गर्दी केली होती़ दुपारनंतर विविध भागातून निघालेल्या मिरवणुकांमध्ये डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता़दरम्यान, डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी रात्री बाराच्या ठोक्याला रेल्वेस्टेशन परिसरातील पुतळा परिसरात फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली़ यावेळी शासकीय कार्यालये, घरांवर विद्युत रोषणाईचा झगमगाट होता़शनिवारी पहाटेपासून महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक घराबाहेर पडत होते़ जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी महापौर शिलाताई भवरे, आ़ डी. पी. सावंत, उपमहापौर विजय गिरडे, शमीम अब्दुला, मनपा आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भगवान वीर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार आदींची उपस्थिती होती़ विविध संघटनांनी डॉ़आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूका काढून अभिवादन केले़हजारो विद्यार्थ्यांचे १८ तास अभ्यास करून अभिवादननवीन नांदेड : सिडको भागातील आंबेडकरवादी मिशनतर्फे आयोजित १८ तास अभ्यास उपक्रमात मिशनच्या ५०० विद्यार्थिनी, १ हजार विद्यार्थ्यांसह हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते़ आंबेडकरवादी मिशनच्या वतीने १४ एप्रिल रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सिडको परिसरातील आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्रात शिक्षण क्रांतीसाठी १८ तास उपक्रम राबविण्यात आला़ दरम्यान, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी अभ्यास केंद्रास भेट देवून उपक्रमाची पाहणी केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, हा उपक्रम राबवून आंबेडकरवादी मिशनने शैक्षणिक क्रांतीचे बिजारोपण केले असून ही देशासाठी एक आदर्श बाब आहे. उपक्रमास आयुर्विमा महामंडळाचे लामतुरे, सहाय्यक विक्रीकर आयुक्त डॉ. शरद खंडाळीकर, स्वारातीम विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. रवी सरोदे व पी. विठ्ठल आदींनी भेट दिली़प्रांरभी, महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस प्रो. डॉ.भास्कर दवणे, केंद्राचे प्रमुख दीपक कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण उपक्रमाची सुरूवात करण्यात आली़ दरम्यान, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त वीर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, पाचंगे, अॅड.हरदडकर, वामनराव गायकवाड यांच्यासह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपक्रमाची पाहणी केली़ शहरातील २ वर्षाच्या बालकांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. यशस्वीतेसाठी धम्मदिप भदरगे, धम्मानंद टोंपे, चंद्रकांत सूर्यवंशी, रावसाहेब कचरे, अक्षय माहुरे, संघमित्रा वाघमारे, स्रेहा वाघमारे, गार्गी धुळे, विद्या भोसीकर, स्वप्नाली खैरमोडे, तेजस्वीनी सरदार, पूजा जाधव, प्रवेश आढागळे, प्रितम भवरे, प्रविण मेडेवार, अभिजीत कांबळे, लक्ष्मी रामटेके, रोहित मिसाळे, जयवर्धन भोसीकर, क्रांतीसूर्य गजभारे यांच्यासह अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.रक्तदानासाठी पुढाकारउन्हाळ्यात रक्ताची टंचाई निर्माण होते़ याची जाणीव ठेवत अनेक जयंती मंडळांनी शनिवारी रक्तदान शिबीरांचे आयोजन करुन बाबासाहेबांना अभिवादन केले़ रक्तदानासाठी तरुणांना आवाहन करण्यात येत होते़दुसरीकडे काही जयंती मंडळांच्या सदस्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेला कचरा उचलून स्वच्छता अभियान राबवित वेगळा संदेश दिला़ग्रंथदान उपक्रमास प्रतिसादडॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी येणाºया अनुयायांनी येताना सोबत किमान एक पुस्तक आणावे असे आवाहन स्वारातीम विद्यापीठातील डॉ़बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने करण्यात आले होते़ ही पुस्तके गोळा करण्यासाठी पुतळ्याजवळ स्टॉल उभारण्यात आला होता़ या स्टॉलवर सकाळपासून अनेकांनी ग्रंथदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती़ तर दुसरीकडे अनेक स्वंयसेवी संघटना, राजकीय पुढाºयांनी केंद्रास भेट देवून ग्रंथ भेट दिले़ या उपक्रमामुळे डॉ़बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या ग्रंथसंपदेत मोठी भर पडली आहे़ केंद्राने यंदा सव्वा लाख ग्रंथांचा संकल्प केला होता़ तर दुसरीकडे रेल्वेस्थानक परिसरात उभारलेल्या बुक स्टॉलवरून डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरूषांच्या जीवन कार्यालयावर आधारीत पुस्तकांची विक्रमी विक्री झाली़
नांदेडसह जिल्ह्यात महामानवाच्या जयंतीचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:43 AM