नांदेड : काँग्रेसचा गड म्हणून ओळख असलेल्या नांदेडमध्येच लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचे तोंड पहावे लागले. या निकालानंतर मागील काही दिवसांपासून जिल्हा काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरु होते. अखेर जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांच्यासह १९ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत शुक्रवारी आपल्या पदाचे राजीनामे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत महाराष्टÑातील दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव झाला होता. मात्र त्या निवडणुकीतही अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडसह हिंगोली मतदारसंघ राखण्यात काँग्रेसने यश मिळविले होते. या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. याही निवडणुकीत राष्टÑवादीच्या मदतीने नांदेड जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकावण्यात पक्षाला यश आले होते. जिल्हा परिषद निवडणुकी पाठोपाठ नांदेड महानगरपालिकेची महत्त्वाची निवडणूक पार पडली. महापालिका खेचण्यासाठी भाजपाने कंबर कसली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निम्मे मंत्रिमंडळ नांदेडमध्ये तळ ठोकून असतानाही अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने महापालिकेवर एकतर्फी झेंडा फडकाविला होता. महापालिकेतील या मोठ्या विजयामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाला यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांचा पराभव झाला.या धक्कादायक निकालामध्ये नुकत्याच उदयास आलेल्या वंचित बहुजन आघाडीचा वाटा मोठा असला तरी जिल्ह्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांच्या प्रभागातही पक्षाला प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा कमी मते मिळाल्याचे पुढे आले होते. या बरोबरच दुसºया फळीतील काही नेत्यांबद्दल सर्वसामान्यांत असलेल्या नाराजीमुळेच अशोकराव चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हा काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाºयांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपले राजीनामे सादर करण्याचा निर्णय घेतला.शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे हे मुंबई येथे एका बैठकीसाठी उपस्थित होते. याचवेळी नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाºयांनी मुंबई येथे जावून आपल्या पदाचे राजीनामे चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले. राजीनामे सादर केलेल्या पदाधिकाºयांमध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांच्यासह जिल्ह्यातील १६ तालुकाध्यक्ष आणि देगलूर, सिडको तसेच तरोडा ब्लॉक अशा १९ पदाधिकाºयांचा समावेश आहे.फेरबदलाची शक्यता: नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना मिळणार संधीयेणाºया काही महिन्यांत काँग्रेसला विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूूमीवर पक्षाची नव्याने पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता व्यक्त होत होती. त्यातच काँग्रेसच्या सर्व १९ पदाधिकाºयांनी पक्षश्रेष्ठींनी आदेश न देताही आपल्या पदाचे राजीनामे सादर केलेले असल्याने येणाºया काळात जिल्हा काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता असून याचा फायदा पक्षाला होऊ शकतो.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसकडून बैठकांवर बैठका झाल्या. प्रत्येक प्रभागांसह जिल्हा परिषद गट आणि गणनिहाय मतदानाची आकडेवारीही तपासण्यात आली. या आकडेवारीवरुन पक्षातील पदाधिकारी नेमके कुठे कमी पडले? याचाही अंदाज पक्षाला आला आहे. त्यामुळेच शुक्रवारी पदाधिकाºयांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर काही पदांवर जिल्ह्यातील काँग्रेसच्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्हा काँग्रेसची होणार पुनर्बांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 12:29 AM
काँग्रेसचा गड म्हणून ओळख असलेल्या नांदेडमध्येच लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचे तोंड पहावे लागले. या निकालानंतर मागील काही दिवसांपासून जिल्हा काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरु होते. अखेर जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांच्यासह १९ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत शुक्रवारी आपल्या पदाचे राजीनामे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले.
ठळक मुद्देनैतिक जबाबदारी स्वीकारली जिल्हाध्यक्षांसह १९ पदाधिकाऱ्यांचे अशोकराव चव्हाण यांच्याकडे राजीनामे सादर