लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात २३ जुलैपासून सुरु असलेल्या आंदोलनाची धग कायम आहे़ गेले चार दिवस जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता कुठेही तोडफोड झाली नाही़ मात्र रविवारी सावरगाव येथे एका युवकाच्या आत्महत्येनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला़ तर माहुरात पैनगंगेच्या पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले़मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने २३ जुलैपासून जिल्ह्यात आंदोलन तीव्र करण्यात आले आहे़ आतापर्यंत या आंदोलनामुळे एकट्या एसटी महामंडळाचे ५० लाखांवर नुकसान झाले आहे़ तर ठिकठिकाणी रास्ता रोको आणि जाळपोळीच्या घटनाही सुरुच आहेत़आतापर्यंत जिल्हाभरात जवळपास ३५ हून अधिक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ त्यामध्ये मराठा समाजातील हजारो कार्यकर्त्यांचा समावेश आहे़३ आॅगस्ट रोजी अर्धापूर रस्त्यावर एका बसवर दगडफेक करुन काचा फोडण्यात आल्या होत्या़ शनिवारी आ़प्रताप पाटील चिखलीकर आणि आ़सुभाष साबणे यांच्या घरासमोर आंदोलकांनी घंटानाद केला़ त्यात शनिवारी रात्री अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील गणपत आबादार यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छतावरुन उडी घेवून आत्महत्या केली़ त्यांच्या आत्महत्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्ग जवळपास तीन तास रोखून धरला होता़ त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळानेही दुपारपर्यंत या मार्गावरील बसेस सोडल्या नव्हत्या़ दुपारी बारा वाजेपर्यंत हे आंदोलन सुरुच होते़ पोलिसांनी मध्यस्थी करीत रस्ता मोकळा करुन दिला़तर दुसरीकडे माहूर येथे सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने रविवारी सकाळी माहूरपासूूूून ५ किमी असलेल्या धनोडा - माहूरदरम्यान पैनगंगा नदीच्या पात्रात आंदोलकांनी दोन तास जलसमाधी आंदोलन केले़ या आंदोलनात २१ जणांनी सहभाग घेतला होता़आंदोलनामुळे परिस्थिती चिघळू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता़ त्यामुळे पैनगंगा नदी परिसराला छावणीचे स्वरुप आले होते़ नदीपात्राजवळ साध्या वेषात पोलीस कर्मचारी, जलतरणपट्टू यासह रूग्णवाहिका ठेवण्यात आली होती़ किनवटचे उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, माहूरचे तहसीलदार विक्रमसिंह राजपूत यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले़ पोलीस उपअधीक्षक आसाराम जहारवाल, पोनि़ लक्ष्मण राख यांच्यासह भोकरचे उपअधीक्षक देशमुख, सिंदखेडचे सपोनि शिवरकर आदींचा समावेश होता़ पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून नंतर सुटका केली़ यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली़
नांदेड जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 12:40 AM
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात २३ जुलैपासून सुरु असलेल्या आंदोलनाची धग कायम आहे़ गेले चार दिवस जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता कुठेही तोडफोड झाली नाही़ मात्र रविवारी सावरगाव येथे एका युवकाच्या आत्महत्येनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला़ तर माहुरात पैनगंगेच्या पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले़
ठळक मुद्देसावरगावात रास्ता रोको : माहुरात जलसमाधी आंदोलन