शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

नांदेड जि.प.चा शिक्षण विभाग ‘राम भरोसे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:48 PM

जिल्हा परिषदअंतर्गत येणा-या प्राथमिक व माध्यमिक आणि निरंतर या तिन्ही विभागाचे शिक्षणाधिकारी पद रिक्त असल्याने शिक्षण विभागाचा कारभार वा-यावर आला असून प्राथमिकसह आता माध्यमिक विभागाचा कारभारही कार्यालय अधीक्षकाकडे सोपविण्याच्या हालचाली सुरु आहेत.

ठळक मुद्देप्राथमिक, माध्यमिक, निरंतर शिक्षणाधिकारी पद रिक्तच

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषदअंतर्गत येणा-या प्राथमिक व माध्यमिक आणि निरंतर या तिन्ही विभागाचे शिक्षणाधिकारी पद रिक्त असल्याने शिक्षण विभागाचा कारभार वा-यावर आला असून प्राथमिकसह आता माध्यमिक विभागाचा कारभारही कार्यालय अधीक्षकाकडे सोपविण्याच्या हालचाली सुरु आहेत.राज्यात भौगोलिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुस-या क्रमांकाचा मोठा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आहे. जिल्ह्यात ३ हजार ७७६ शाळा असून या शाळांमध्ये २३ हजार शिक्षक व कर्मचा-यांची संख्या आहे. त्यामध्ये जवळपास दहा हजार शिक्षक हे जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहेत. इतका मोठा अवाढव्य कारभार असताना नियोजनाअभावी तसेच पदाधिकाºयांच्या अरेरावीमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी पद सहा महिन्यांपासून रिक्त आहे. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पद हे दहा महिन्यांपासून तर निरंतर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी पद पाच महिन्यांपासून रिक्त आहे. तिन्ही विभागांचे शिक्षणाधिकारीपद रिक्त असताना जिल्हा परिषदेचे सहा उपशिक्षणाधिकारी पदेही रिक्तच आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षण विभागाचा कारभार ‘राम भरोसे’ च सुरु आहे. प्राथमिक शिक्षण विभागाचा पदभार हा अधीक्षक बी. आय. येरपुलवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर माध्यमिक शिक्षण विभागाची सूत्रेही आता अधीक्षक गज्जेवार यांच्याकडे सोपविण्याबाबतची संचिका अंतिम टप्प्यात आली आहे.जवळपास २३ हजार शिक्षक, कर्मचाºयांची संख्या व पावणेचार हजार शाळा असलेल्या जिल्ह्यात न्यायालयीन प्रकरणाची संख्याही भरपूर आहे. या न्यायालयीन प्रकरणांमध्ये शिक्षण विभागाची बाजू मांडण्यासाठी सक्षम अधिका-यांना पाठविणे आवश्यक आहे. त्याचवेळी पुणे, मुंबई, लातूर आदी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयामध्ये होणा-या बैठकांसाठीही अधिका-यांची उपस्थिती आवश्यक असते. मात्र जिल्ह्यात आजघडीला सक्षम अधिकारीच नसल्यामुळे उपलब्ध कर्मचा-यांना बैठकीसाठी पाठविण्यात येत आहे.एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रमातून गुणवत्तावाढीचे प्रयत्न शिक्षण विभाग करीत असले तरी पर्यवेक्षिय यंत्रणाच नसल्याने शासनाकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम जिल्ह्यात कागदावरच राबविले जात असल्याचे चित्र आहे. परिणामी शैक्षणिक गुणवत्तेवरही मोठा परिणाम होत आहे.या सर्व बाबींकडे जि. प. पदाधिकारी मात्र गांभीर्याने पाहत नसल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांना रुजू होण्यासाठी पदाधिका-यांकडून नकारघंटा दिली आहे. तर इतर अधिकारी मात्र शिक्षण विभागाचा पदभार घेण्यास नकार देत आहेत. त्यात अशोक देवकरे यांच्याकडे शिक्षण विभागाचा पदभार सोपविला होता.मात्र ते रजेवर गेले तर महापालिकेचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनीही जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सांभाळण्यास असमर्थता दर्शविली आहे. एकूणच पदाधिकाºयांच्या एकाधिकारशाहीमुळे शिक्षण विभागात रुजू होण्यास अधिकाºयांनी अनिच्छा दर्शविली आहे. या सर्व घडामोडींचा फटका मात्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर बसत आहे.जिल्हा प्रशासनाकडून स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल नांदेड मोहिमेअंतर्गत मार्गदर्शन केले जात आहे. राज्यभरातील तज्ज्ञ मार्गदर्शक नांदेडमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. जिल्ह्यातून अधिकारी घडावेत या हेतूने प्रशासनाने हा उपक्रम सुरु केला असला तरी प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाची जिल्ह्यातील अवस्था पाहता उज्ज्वल नांदेड मोहिमेच्या हेतूला तडा जात आहे. याकडे जिल्हाधिका-यांनीच आता लक्ष घालणे आवश्यक झाले आहे.