नांदेड : जिल्ह्यात सुरु असलेले मटका अड्डे, कार्यरत असलेली दुचाकी वाहनांची टोळी, प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लावण्यात आलेले अपयश तसेच आगामी काळातील निवडणुका यामुळे जिल्हा पोलीस दलात मोठ्या फेरबदलाची तयारी केली जात असून, स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षकांसह महत्वाच्या ठाण्यांचे प्रभारी बदलले जाणार आहेत.जिल्ह्यात खुलेआम सुरु असलेला मटका स्थानिक पोलिसांच्या सहकार्याशिवाय चालणे अशक्यप्राय बाब आहे. त्यातच सध्या दुचाकी चोरीचे प्रमाणही वाढले आहे. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्हाभरात वाहन चोरीच्या घटना नित्यच झाल्या आहेत. याबाबत अनेक तक्रारी आल्या असल्या तरी या वाहन चोेरट्यांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. तेलंगणातील सार्वजनिक बस चोरुन तिची विल्हेवाट नांदेड जिल्ह्यात लावण्यात आली होती.या टोळीमध्ये भोकरसह नांदेड शहरातील देगलूरनाका भागातील अट्टल चोरट्यांचा सहभाग होता. हे तेलंगणा पोलिसांनी स्पष्ट केले होते. मात्र नांदेड पोलीस दलाकडून जिल्ह्यात होत असलेल्या वाहन चोरीला आळा घालण्यात अपयश आले आहे. या व अन्य कारणांमुळे नुकतीच पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी शिवाजीनगर ठाण्याची ‘डीबी’ बरखास्त केली होती.पोलीस दलाच्या बैठकीत जाधव यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी तत्पर राहण्याच्या सूचना करताना ज्या ठाणे हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यात अपयश येईल त्या ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल असेही स्पष्ट केले. आगामी काळातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता जिल्ह्यात शांतता प्रस्थापित ठेवण्याचे मोठे आव्हान पोलीस दलापुढे राहणार आहे. हीच बाब पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी लक्षात घेऊन जिल्ह्यातील ठाणेनिहाय कामगिरीचा आढावा घेण्यास प्रारंभ केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेकडूनही अनेक प्रलंबित गुन्ह्याचा शोध लावण्यात आला नाही. त्यात शहरातील पोलीस कर्मचाºयाचा भरदिवसा दगडाने ठेचून केलेला खून, एका मतिमंद मुलीवर अत्याचार करुन जाळण्याचा प्रकाराचा तपासही अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे अशा गंभीर प्रकरणात पोलिसांची प्रतीमा मलीन होत आहे.जिल्ह्यात वाळुचे चोरीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात सुरु होते. मागील पंधरा दिवसांत तब्बल आठ ते दहा कोटींच्या वाळू चोरींचे गुन्हे उमरी, कुंटूर, नांदेड ग्रामीण आदी ठाण्यात दाखल झाले आहेत.इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असताना पोलीस गप्प का होते? हा विषयही चर्चेचाच झाला आहे. गोदावरी काठचे ठाणे मिळविण्यासाठी पोलीस अधिकारीतसेच कर्मचाºयांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. इतकेच नव्हे तर राजकीय वरदहस्तांचाही वापर केला जात आहे.ठाणे प्रभारींच्या खुर्च्या बदलण्याची तयारीएकूणच पोलीस दलाची सामान्यात निर्माण होत असलेली प्रतीमा सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी आता पावले उचलली आहेत. त्यातच ठाणे प्रभारीच्या खुर्च्या बदलण्याची तयारीही केली जात आहे. यात स्थानिक गुन्हा शाखेचा पदभार मिळविण्यासाठी पोलीस अधिकाºयांत मोठी स्पर्धा लागली आहे. ही खुर्ची मिळविण्यासाठी राजकीय वजनही वापरण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हा शाखेचा कारभारी होण्यात कोणाला यश येते? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. किनवट ठाण्याच्या प्रभारीपदी नव्यानेच आलेले मारोती ज्ञानोजी थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे पोलीस निरीक्षक दिलीप तिडके हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते.
नांदेड जिल्हा पोलीस दलात फेरबदलाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:20 AM
जिल्ह्यात सुरु असलेले मटका अड्डे, कार्यरत असलेली दुचाकी वाहनांची टोळी, प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लावण्यात आलेले अपयश तसेच आगामी काळातील निवडणुका यामुळे जिल्हा पोलीस दलात मोठ्या फेरबदलाची तयारी केली जात असून, स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षकांसह महत्वाच्या ठाण्यांचे प्रभारी बदलले जाणार आहेत.
ठळक मुद्देगुन्हेगारी : अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबितमटकाअड्डे, वाहन चोरट्यांची टोळी सक्रिय